
नवनिर्मितीची वेळीच नोंद आवश्यक
ich186.jpg
69235
इचलकरंजी ः व्यंकटेश महाविद्यालयामध्ये बौद्धिक संपदा हक्कावर आयोजित व्याख्यानात बोलताना अमित महाजन.
-------
नवनिर्मितीची वेळीच नोंद आवश्यक
अमित महाजन; व्यंकटेश महाविद्यालयात कार्यशाळा
इचलकरंजी, ता. १९ : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात नवनिर्मितीस प्रचंड वाव आहे; परंतु योग्य कायद्याखाली त्याची वेळीच नोंद करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्या नवनिर्मिती व बौद्धिक संपदेतून ज्यांना कीर्ती व संपत्ती प्राप्त करावयाची आहे. त्यांनी बौद्धिक संपदा हक्क कायद्याची माहिती घ्यावी. बौद्धिक संपत्तीची चोरी होण्याची दाट शक्यता असते, त्यामुळे कॉपीराईट, पेटंट, ट्रेडमार्क व बौद्धिक संपदा हक्क याविषयी समाजामध्ये जागरुकता आणणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रमुख वक्ते अमित महाजन यांनी केले.
व्यंकटेश महाविद्यालयामध्ये कॉलेज संशोधन समितीमार्फत ‘शोध, नवोपक्रम आणि बौद्धिक संपदा हक्क’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. व्ही. ए. माने होते. आजच्या तरुण पिढीत नवनिर्मितीची प्रचंड क्षमता आहे. नव संशोधकांनी समाज उपयोगी संशोधनासाठी पुढे आले पाहिजे व आपल्या संशोधनास संरक्षण देण्यासाठी ट्रेडमार्क, पेटंट, बौद्धिक संपदा हक्क यासारख्या कायद्यांचा अभ्यास केला पाहिजे, असे डॉ. माने यांनी सांगितले. प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ. एन. एम. मुजावर यांनी करून दिली. सूत्रसंचालन मोहिनी आंचलिया हिने केले. आभार डॉ. बी. एन. कांबळे यांनी मानले.