केएमटी इतर प्रकल्प केंव्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केएमटी इतर प्रकल्प केंव्हा
केएमटी इतर प्रकल्प केंव्हा

केएमटी इतर प्रकल्प केंव्हा

sakal_logo
By

केएमटी कटआऊट फोटो
---
उत्पन्नाच्या मार्गांकडे केएमटीचा कानाडोळा
मुद्दे केवळअंदाजपत्रकातच; अधिकाऱ्यांकडून हवेत प्रयत्न

उदयसिंग पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ ः आंदोलनाच्या रेट्यामुळे केएमटीचा तोटा कमी करण्यासाठी प्रशासन बस फेऱ्या कमी करणार आहे. उत्पन्न वाढवण्यासाठी लोकप्रतिनिधी नवीन बसेस मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यातून प्रवाशांसाठीची सेवा सुधारता येईल. पण, ठिकठिकाणच्या जागांवरील व्यापारी संकुले, पार्किंगचे ठेके, जाहिराती असे उत्पन्न मिळवून देणाऱ्या मार्गांकडे केएमटी प्रशासन कानाडोळा करत असल्याची स्थिती आहे. आर्थिक अवलंबित्व संपवण्यासाठी असे मार्ग धुंडाळल्याशिवाय प्रशासनाला आता पर्याय राहिलेला नाही. त्यासाठी अधिकाऱ्यांकडूनच शर्थीचे प्रयत्न अपेक्षित आहेत.
विविध संघटनांनी आंदोलने केल्यानंतर प्रशासनाने तोट्यातील मार्गांवरील फेऱ्या कमी करण्याचा विचार चालवला. त्यातून तोटा कमी होऊ शकेल. उत्पन्न वाढीसाठी नवीन बस ताफ्यात आणणे हा एक पर्याय आहे. त्यासाठी काही लोकप्रतिनिधींनी मदत केली असून, काहीजणांनी प्रयत्न चालवला आहे. पण, प्रशासनासमोर असलेल्या अन्य मार्गांचा विचार प्रत्यक्षात अंमलात आणण्याच्यादृष्टीने अतिशय संथ प्रयत्न केले जात आहेत. त्यापेक्षा हे प्रयत्न यशस्वी व्हावेत, यासाठी अधिकारी झटून काम करत नसल्याचे जाणवते.
जागा विकसित करण्याचा अनेक वर्षांपासूनचा विषय आहे. त्यासाठी काही जागा ताब्यात घ्यायच्या आहेत तर काही ठिकाणी काय करायचे हेच ठरवलेले नाही. जागांवर व्यापारी संकुले उभी करण्याचा मुद्दा केवळ मागील वर्षावरून पुढील वर्षातील अंदाजपत्रकात छापला जात आहे. माऊली चौकातील जागा जिल्हा प्रशासनाकडून नावावर करून घ्यायची आहे. परिवहन समिती असताना ही बाब करून घेता आली असती. पण, आता तर अधिकाऱ्यांनी, अधिकाऱ्यांना सांगता आले असते. याशिवाय एमआयडीसीतील जागा, मनोरा हॉटेल समोरील जागा या जागांसाठी असलेल्या अडचणी केव्हा तरी पाठीमागे लागून संपवाव्या लागणार आहेत. याबाबत प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याचे ऐकीवात नाही. कोट्यवधी किमतीच्या जागा अक्षरशः पडून आहेत.
सध्या केएमटीच्या अनेक मोक्याच्या ठिकाणी कार्यालये वा इमारती आहेत. तिथे जाहिरातींचे होर्डिंग्ज उभे करून मोठे उत्पन्न मिळवले जाऊ शकते. तसेच महापालिकेने खासगी जागांवर पार्किंग करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार केएमटीनेही नवीन पार्किंगच्या जागा विकसित करायला हव्यात. त्यांचा ठेका देऊन बिनखर्चाचे उत्पन्न मिळवले जाऊ शकते. सध्या इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत आहे. केएमटीही तशा बसचा विचार करत आहे. भविष्यातील गरज ओळखून जागा असलेल्या ठिकाणी पार्किंगसह चार्जिंग स्टेशन उभे केल्यास त्याचा निश्‍चितच फायदा होईल.

चौकट
उत्पन्नासाठी अन्य मार्ग
-जाहिरातींसाठी होर्डिंग्ज उभी करणे
-बसमध्ये स्‍क्रिनवर जाहिराती करणे
-ठिकठिकाणी पार्किंगच्या जागा तयार करणे
-चार्जिंग स्टेशन उभी करणे

कोट
केएमटीकडे एक अभियंता नियुक्त करण्यात आला आहे. त्यांच्या माध्यमातून जागा विकसित करण्याची अनुषांगिक कामे केली जातील. अन्य मार्गांसाठीही प्रयत्न केले जातील.
-टिना गवळी, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक, केएमटी.