कसबा बावडा क्रिकेट स्पर्धांचे उद्‌घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कसबा बावडा क्रिकेट स्पर्धांचे उद्‌घाटन
कसबा बावडा क्रिकेट स्पर्धांचे उद्‌घाटन

कसबा बावडा क्रिकेट स्पर्धांचे उद्‌घाटन

sakal_logo
By

69387

भाऊराव पाटील स्मृतिचषक
आंतरराज्य क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ


कोल्हापूर, ता. १८ : डॉ. डी. वाय. पाटील कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्टतर्फे आजपासून यशवंतराव भाऊराव पाटील स्मृतिचषक
आंतरराज्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ झाला. कसबा बावड्यातील पॅव्हेलियन मैदानावर आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. राधेय स्पोर्टस्‌ संयोजक आहेत.
तत्पूर्वी, आमदार श्री. पाटील यांच्या हस्ते श्री गजानन महाराज आणि यशवंतराव भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. पहिले बक्षीस ७५ हजार, फिरता चषक व कायमचा चषक, दुसरे बक्षीस ५१ हजार व कायमचा चषक तर उपांत्य फेरीतील पराभूत संघाला ११ हजार रुपये प्रत्येकी आणि इतर वैयक्तिक बक्षिसे असतील. माजी नगरसेवक सुभाष बुचडे, हरीश चौगले, अशोक जाधव, मोहन सालपे, डॉ. संदीप नेजदार, राहुल माने, सुजय पोतदार, तौफिक मुल्लानी, सागर यवलुजे, संजय लाड, अमर समर्थ, श्रीराम सोसायटीचे सभापती हिंदूराव ठोंबरे, राधेय स्पोर्टसचे अध्यक्ष जयदीप जामदार, तानाजी लांडगे, संजय पोवार, शंतुनू पाटील आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
...
निकाल असा (८ षटके) :
१) पहिला सामना पूर्वा स्पोर्टस्‌ (यमगर्णी) ४ बाद ६६ विरुद्ध संदीप स्पोर्टस्‌ ७ षटके ४ बाद ६७ विजयी
२) शिवनेरी प्रणित समर्थ वेजीस स्पोर्टस्‌ ८ बाद ५७ वि.वि. जी. एम. स्पोर्टस्‌ ६ षटके १० बाद १८ धावा
३) पृथ्वी स्पोर्टस्‌ (जयसिंगपूर) ५ बाद ९७ वि.वि. संयुक्त कनाननगर ६ षटके १० बाद २६
४) पारगाव स्पोर्टस्‌ ७ बाद ८० धावा वि.वि. इंडीया ११ स्पोर्टस्‌ ८ षटके ३ बाद ७७ धावा
५) पृथ्वी स्पोर्टस्‌ जयसिंगपूर ७ बाद ५९ धावा वि.वि. शिवनेरी प्रणीत समर्थ वेजीस स्पोर्टस्‌ ८ षटके ५ बाद ४८ धावा.
...

पुढील फेरीत गेलेले संघ
१) (कै.) संदीप स्पोर्टस्‌
२) पारगाव स्पोर्टस्‌
................
उद्याचे सामने
-पृथ्वी स्पोर्टस्‌ जयसिंगपूर
-गुरू स्पोर्टस्‌ विरुद्ध विराट स्पोर्टस्‌
-जिवलग स्पोर्टस्‌ विरुद्ध दख्खन स्पोर्टस्‌ (पन्हाळा)
-गुरु स्पोर्टस्‌ ‘ब’ विरुद्ध युवराज स्पोर्टस्‌ (नागाव)
-(कै.) राजू वावरे स्पोर्टस्‌ विरुद्ध रिंग रोड स्पोर्टस्‌
-दुपारी ३ वा. दुसऱ्या सामन्यातील विजयी संघ विरुद्ध तिसऱ्या सामन्यातील विजयी संघ