कोडग्रस्तांचा वधुवर मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोडग्रस्तांचा वधुवर मेळावा
कोडग्रस्तांचा वधुवर मेळावा

कोडग्रस्तांचा वधुवर मेळावा

sakal_logo
By

कोडग्रस्तांच्या वधू-वर
मेळाव्यात २५ जणांचा सहभाग
कोल्हापूर, ता. १८ ः अंगावर पांढरा डाग असला की त्या व्यक्तीशी विवाहाचा विचारही केला जात नाही. अशा व्यक्तींच्या वाट्याला आयुष्यभर उपेक्षेला सामोरे जावे लागते. मात्र, आज राजर्षी शाहू स्मारक भवनात झालेल्या कोडग्रस्तांच्या वधू - वर मेळाव्यात हे चित्र काहीसे बदललेले दिसले. कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कर्नाटकातून आज कोडग्रस्तांनी मेळाव्यात हजेरी लावली. श्वेता असोसिएशनतर्फे आयोजित मेळाव्‍यात २५ इच्छुकांनी सहभाग नोंदवला. यातील एकाने कोड नसतानाही पांढरा डाग असलेल्या मुलीशी विवाह करण्यास सहमती दर्शवली. त्यामुळे समाजाने झिडकारलेल्या व्यक्तींच्या आयुष्यात सन्मानाने जगण्याची आशा पल्लवीत झाल्याचे अधोरेखित झाले.
पांढरे डाग आणि कोड वैद्यकीयदृष्ट्या आजार नसतानाही केवळ अंधश्रद्धा व गैरसमजुतीमुळे अंगावर डाग किंवा कोड असणाऱ्यांच्या वाट्याला उपेक्षा येते. या पार्श्वभूमीवर पांढरे डाग किंवा डाग याबाबतच्या गैरसमजुती दूर करण्यासाठी संबंधित व्यक्तीचे आयुष्य आनंदी बनविण्यासाठी श्वेता असोसिएशनकडून प्रयत्न केले जातात. त्याचाच भाग म्हणून रविवारी (ता. १८) कोडग्रस्तांसाठी वधू-वर मेळावा झाला. यापुर्वी मेळाव्यात मुलींची संख्या फारशी नव्हती. यंदा मुलींनीही आत्मविश्वासाने पुढाकार घेत उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी श्वेता असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. माया तुळपुळे, ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी, अवनि संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले, डॉ. रचना संपतकुमार उपस्थित होते.