Wed, Feb 8, 2023

जिल्हास्तरीय लोकगीत स्पर्धा
जिल्हास्तरीय लोकगीत स्पर्धा
Published on : 18 December 2022, 2:36 am
६९३७७
जिल्हास्तरीय लोकगीत,
लोकनृत्य स्पर्धेला प्रारंभ
कोल्हापूर, ता. १८ ः येथील नटराज स्टुडिओच्या वतीने आजपासून जिल्हास्तरीय लोकगीत, लोकनृत्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला प्रारंभ झाला. शाहीर आझाद नायकवडी, नृत्य दिग्दर्शक दीपक बिडकर, हेमसुवर्णा मिरजकर, अभिनेता एन. डी. चौगले, संजय पटवर्धन, बबन रानगे, माजी नगरसेविका उमा इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेला प्रारंभ झाला.
भारूड, धनगरी ओव्या, लावणी, पोतराज, शाहिरी पोवाडा, टपेटा गुल्लू अशा विविध लोकगीत आणि लोकनृत्याचे सादरीकरण झाले. शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतून प्राथमिक फेऱ्या होणार असून त्यानंतर महाअंतिम फेरी होणार आहे. यावेळी मिसेस इंडिया राजेश्वरी मोटे, मिसेस महाराष्ट्र स्टाईल आयकॉन रेणुका केकतपुरे, नृत्य दिग्दर्शक अक्षय कदम उपस्थित होते.