रस्त्यातील डांबर तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्त्यातील डांबर तपासणी
रस्त्यातील डांबर तपासणी

रस्त्यातील डांबर तपासणी

sakal_logo
By

69390

डांबराची रस्त्यावरच तपासणी
महापालिकेकडून कार्यवाही; चारही वॉर्डमध्ये स्वतंत्र मशीन
कोल्हापूर, ता. १८ ः रस्ते डांबरीकरणावेळी ठेकेदाराकडून दर्जा राखण्यासाठी महापालिकेने आता प्रत्यक्ष कामात वापरल्या जाणाऱ्या मालातील डांबराचे प्रमाण तपासण्यास सुरवात केली आहे. याप्रकारे चारही वॉर्डमध्ये स्वतंत्र मशिनरीने तपासणी केली जाणार आहे.
डांबरीकरणावेळी योग्य प्रमाणात डांबर नसल्याने रस्ता वा पॅचवर्क लगेच उखडला जात असल्याच्या शहरवासीयांच्या तक्रारी होत्या. त्यावरून आंदोलने झाली, महापालिकेच्या कारभारावर बोट ठेवले गेले. त्यानंतरही केल्या जात असलेल्या कामांबाबत तक्रारी होत्या. पॅचवर्कच नव्हे, तर नवीन रस्ताही खराब होत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यामुळे प्रशासकांनी ठेकेदार, संबंधित अधिकाऱ्यांना दंड केला. यानंतर रस्तेकामाच्या ठिकाणी जाऊन तेथील मालाची तपासणी करण्याचे ठरवले होते. त्यानुसार शाहूपुरी सहाव्या गल्लीत पेव्हर पद्धतीने केल्या जात असलेल्या डांबरीकरणातील मालाची तपासणी करण्यात आली. कामासाठी वेगवेगळ्या प्रकारची डांबरी खडी वापरली जाते. प्रत्येक प्रकारासाठी वेगवेगळा डांबराचा डोस अपेक्षित आहे. या तपासणीत डांबराचा डोस तपासला जात आहे. मालाच्या तपासणीत डांबराचे योग्य प्रमाण नसल्यास तो माल रस्त्यासाठी वापराला जाऊ देणार नाही, असे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले.