बेमुदत उपोषणाचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेमुदत उपोषणाचा इशारा
बेमुदत उपोषणाचा इशारा

बेमुदत उपोषणाचा इशारा

sakal_logo
By

...तर २६ जानेवारीपासून
मनपासमोर बेमुदत उपोषण

कॉमन मॅन, प्रजासत्ताक संस्थेचा इशारा

कोल्हापूर, ता. १९ ः महापालिकेने पाणी परिषद भरवावी, केएमटीचे तोट्यातील मार्ग बंद करावेत, या मागण्या मान्य केलेल्या नाहीत. त्यामुळे केएमटीची बैठक तसेच पाणी परिषद भरवण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही तर २६ जानेवारीपासून महापालिकेसमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा कॉमन मॅनचे ॲड. बाबा इंदुलकर व प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी दिला आहे.
पत्रकात म्हटले आहे, तोट्याचा अभ्यास न करता ग्रामीणमध्ये फिरणाऱ्या केएमटीचा होणारा १.६० कोटींचा तोटा भरून काढण्यासाठी महापालिकेला कोट्यवधी रुपये केएमटीला द्यावे लागतात. ही बाब शहरातील कर भरणाऱ्या नागरिकांवर अन्याय करणारी आहे. शहरातील विकासकामांसाठी, रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी जो निधी वापरता आला असता तो अयोग्य कामाकडे वळवला जात आहे. निर्णय घेण्याचा माझा अधिकार नाही असे केएमटीकडून मोघमात सांगितले जाते. पाण्याचा किती उपसा, कितीचे बिलिंग, चोरी, ग्रामीणने थकवलेली पाणीपट्टी या विषयांवर सर्वसमावेशक पाणी परिषद भरवा अशी तीन महिने जलअभियंत्यांकडे विनंती करत आहे. ते काहीच बोलत नाहीत. केएमटीचे अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक व जलअभियंत्यांमुळे महापालिकेचे नुकसान होत आहे. दोन्ही विषयासाठी त्वरित बैठक बोलवावी. अन्यथा सहकाऱ्यांसह बेमुदत उपोषण केले जाईल.