पोलिस पाटलांच्या मागण्या सोडवाव्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस पाटलांच्या मागण्या सोडवाव्यात
पोलिस पाटलांच्या मागण्या सोडवाव्यात

पोलिस पाटलांच्या मागण्या सोडवाव्यात

sakal_logo
By

ajr191.jpg
69548
गारगोटी (ता. भुदरगड) ः येथे आमदार प्रकाश आबिटकर यांना निवेदन देताना आजरा तालुका पोलिस पाटील संघटनेचे पदाधिकारी.
--------------------------
पोलिस पाटलांच्या मागण्या सोडवाव्यात
आजरा तालुका संघटनेतर्फे आमदार आबिटकरांकडे मागणी
आजरा, ता. १९ ः नागपूर येथे बुधवारपासून (ता. २१) हिवाळी अधिवेशन होत आहे. महाराष्ट्र राज्य पोलिस पाटील संघटनेतर्फे प्रलंबित मागण्यासंदर्भात मोर्चाचे आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर आजरा तालुका पोलिस पाटील संघटनेतर्फे आजरा-भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. पोलिस पाटील यांच्या प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती केली.
किमान वेतन कायद्यानुसार पोलिस पाटील यांना १५ हजार रुपये मानधन मिळावे. निवृत्ती वयोमर्यादा ६० वरून ६५ वर्षे करावी. नूतनीकरण कायमचे बंद करावे. कोरोनातील अतिरिक्त तीन महिन्यांचे मानधन मिळावे. पोलिस पाटील निवृत्तिवेतन मिळावे, अशा विविध मागण्या निवेदनातून केल्या आहेत. आमदार आबिटकर यांच्याशी पोलिस पाटील संघटनेच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली. अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार आबिटकर यांनी सांगितले. पोलिस पाटील युवराज देसाई, रणजित परीट, मोहन सावंत, रणजित सुतार, अशोक कांबळे, सागर देसाई, सुभाष आजगेकर, शांताराम पाटील, गीता पाटील, रेश्मा गावडे, वैशाली कांबळे, रुपाली कांबळे, गीता तेजम, वैजयंता कांबळे आदींची स्वाक्षरी आहे.