''मविप''तर्फे फोल्डस्कोप कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''मविप''तर्फे फोल्डस्कोप कार्यशाळा
''मविप''तर्फे फोल्डस्कोप कार्यशाळा

''मविप''तर्फे फोल्डस्कोप कार्यशाळा

sakal_logo
By

gad1911.jpg
69554
गडहिंग्लज : मराठी विज्ञान परिषद व भारतीय राष्ट्रीय युवा विज्ञान अकादमीतर्फे झालेल्या कार्यशाळेत फोल्डस्कोप तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविताना अवनीश उत्सव.
----------------------------
''मविप''तर्फे फोल्डस्कोप कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १९ : मराठी विज्ञान परिषदेच्या येथील शाखा व भारतीय राष्ट्रीय युवा विज्ञान अकादमीतर्फे फोल्डस्कोप तयार करण्याची कार्यशाळा झाली. गडहिंग्लज सायन्स सेंटरच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त या कार्यशाळेचे आयोजन केले होते. सायन्स सेंटरच्या सभागृहात ही कार्यशाळा झाली.
टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे संशोधक समन्वयक अवनीश उत्सव, भाभा अणुसंशोधन केंद्राचे डॉ. विवेक पारकर, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे प्रा. शरद पाटील यांनी फोल्डस्कोप कसे तयार करावेत याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या फोल्डस्कोपमधून जीवाणू, छोटे किटक, फुलातील परागकण नैसर्गिक आकारमानापेक्षा १४० पट मोठे करुन पाहता आले. मायक्रोस्कोप नाहीत अशा शाळांमध्ये फोल्डस्कोप वापरुन सुक्ष्मजीवांचा अभ्यास करणे शक्य होणार आहे.
कार्यशाळेत पार्वती शंकर विद्यालय उत्तूर, वि. दि. शिंदे हायस्कूल, छत्रपती शिवाजी विद्यालय, गडहिंग्लज हायस्कूल, एस. एम. हायस्कूल बसर्गेचे नववीचे ३२ विद्यार्थी व तीन शिक्षक सहभागी झाले होते. अभिलाषा चव्हाण, संगीता पाटोळे, संजय घाटगे, डॉ. वरुण धूप, विश्वनाथ धूप, बी. डी. पाटील यांनी कार्यशाळेचे संयोजन केले. बी. जी. काटे, डॉ. एस. के. नेर्ले आदी उपस्थित होते.