कलेच्या माध्यमातून लोकप्रबोधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कलेच्या माध्यमातून लोकप्रबोधन
कलेच्या माध्यमातून लोकप्रबोधन

कलेच्या माध्यमातून लोकप्रबोधन

sakal_logo
By

chd192.jpg
69550
तावरेवाडी ः यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रमातून उपस्थितांचे मनोरंजन केले.
-----------------------------------
कलेच्या माध्यमातून लोकप्रबोधन
हलकर्णीच्या विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनातून जिंकली तावरेवाडीकरांची मने

सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १९ ः हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रमातून तावरेवाडी (ता. चंदगड) ग्रामस्थांची मने जिंकली. महाविद्यालयाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिर अंतर्गत हा उपक्रम राबवला. गोपाळ पाटील अध्यक्षस्थानी होते.
रामचंद्र कागणकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्‌घाटन झाले. विद्यार्थ्यांनी आपल्या अंगभूत कलागुणांचे सादरीकरण करताना मनोरंजनाबरोबरच लोकप्रबोधन केले. सुधा कागणकर व नयना ओऊळकर यांची लावणी आकर्षण ठरली. करुणा तानगावडे यांचे शेतकरी गीत तर माधुरी सुतार यांचे शेतकरी नवरा हवा या नाटिकेला उपस्थितांनी दाद दिली. इंद्रायणी पाटील यांनी देशभक्तिपर गीत सादर केले. तावरेवाडी विद्यामंदिरची विद्यार्थिनी काव्या सुतार हिच्या नृत्याची उपस्थितांनी वाहवा केली. पत्रकार विलास कागणकर यांना जिल्हा परिषदेचा आचार्य अत्रे पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रकल्प अधिकारी पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला. पोलिसपाटील काशीनाथ कागणकर, प्रा. शाहू गावडे, प्रा. अंकुश नौकुडकर, डॉ. ज्योती व्हटकर, वंदना केळकर, राजू बागडी, दिलीप पाटील, महेश सांबरेकर उपस्थित होते. प्रा. जी. जे. गावडे यांनी सूत्रसंचालन केले.