डी मार्टमध्ये वस्तुवरील किंमतीत फेरफार केल्याप्रकरणी ३ जणांवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डी मार्टमध्ये वस्तुवरील किंमतीत फेरफार केल्याप्रकरणी ३ जणांवर कारवाई
डी मार्टमध्ये वस्तुवरील किंमतीत फेरफार केल्याप्रकरणी ३ जणांवर कारवाई

डी मार्टमध्ये वस्तुवरील किंमतीत फेरफार केल्याप्रकरणी ३ जणांवर कारवाई

sakal_logo
By

बारकोड फेरफारप्रकरणी
तीन महिलांवर गुन्हा दाखल

डी मार्ट मधील प्रकार : एकाच कुटुंबातील तीन महिला
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ ः डी मार्ट मधील वस्तूंवरील बारकोड टॅग काढून त्याजागी दुसऱ्या वस्तूंवरील कमी किंमतीचे टॅग लावून फसवणूक करण्याचा प्रकार आज समोर आला. या प्रकरणी गौसिया अब्दुलरहीम बांगी, बिबीआयेशा अब्दुलरहीम बांगी आणि जुलेखा अब्दुलरहीम बांगी (तिघी. रा. सागरमाळ, जवाहरनगर, कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या महिला एकाच कुटुंबातील असून त्यांच्यावर डी मार्टची ४ हजार ४५३ रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. शाहूपुरी पोलिसांनी ही कारवाई केली.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिघी रविवारी दुपारी डी मार्टमध्ये खरेदीसाठी गेल्या होत्या. या वेळी त्यांनी दोन बॅग, दोन पर्स, एक बूट आणि एक पाण्याची बाटली खरेदी केली. या वस्तूंवरील बारकोड काढून त्यांनी कमी किंमतीच्या वस्तूंचे बारकोड या वस्तूंवर लावले. बिलिंग काउंटरवर बारकोड स्कॅन केल्यावर तेथील कर्मचाऱ्यांना वस्तूंच्या किमतीत तफावत आढळून आली. त्यामुळे त्यांचा संशय बळावला. या वेळी डी मार्ट मधील कर्मचाऱ्यांनी या महिलांनी जेथून वस्तू खरेदी केल्या तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये बारकोडची फेरफार करताना या तिघी दिसून आल्या. त्यामुळे त्यांच्या विरोधात फिर्याद देण्यात आली. या तक्रारीची दखल घेऊन शाहूपुरी पोलिसांनी तीन महिलांवर गुन्हा दाखल केला.