बाजार समिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाजार समिती
बाजार समिती

बाजार समिती

sakal_logo
By

बाजार समितीच्या प्रशासक मंडळात बदल

मोहळकर नवे अध्यक्ष ः युसूफ शेख यांची सदस्यपदी नियुक्ती

कोल्हापूर, ता. १९ ः कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळात बदल करण्यात आला. नव्या बदलानुसार मंडळाच्या अध्यक्षपदी विशेष लेखा परीक्षक (साखर) पांडुरंग मोहळकर यांची, तर सदस्यपदी राधानगरीचे सहायक निबंधक युसूफ शेख यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी यासंदर्भातील आदेश आज काढले.
बाजार समितीच्या विद्यमान संचालकांची मुदत ५ ऑगस्ट २०२० रोजी संपली आहे. त्यानंतर काही कालावधीसाठी समितीवर माजी आमदार के. पी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अशासकीय मंडळाची नियुक्ती करण्यात आली होती. या मंडळाची मुदत संपल्यानंतर समितीवर २२ एप्रिल २०२२ रोजी प्रशासक नियुक्तीची कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी अध्यक्षपदी शहरचे सहाय्यक निबंधक प्रकाश जगताप व सी. एम. इंगवले यांची नियुक्ती अनुक्रमे अध्यक्ष व सदस्य या पदावर करण्यात आली होती. जगताप यांची अलीकडेच सहकार मंत्री अतुल सावे यांच्याकडे विशेष कार्य अधिकारी पदावर नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीमुळे रिक्त झालेल्या जगताप यांच्या जागी मोहळकर, तर इंगवले यांच्या जागी शेख यांची आज नियुक्ती करण्यात आली.
..............