
पंचमहोत्सव गुजरात
गुजरातमधील पंच महोत्सवाचा
पर्यटकांनी लाभ घ्यावा
बळीराम वराडे ः गुजरात टुरिझमच्या वतीने मेळाव्याचे आयोजन
कोल्हापूर, ता. १९ ः गुजरातमध्ये २५ ते ३० डिसेंबर या कालावधी होणाऱ्या पंच महोत्सवाला कोल्हापूर व परिसरातील पर्यटकांनी भेट द्यावी, असे आवाहन कोल्हापुरातील ट्रॅव्हल एजंटांच्या वतीने आयोजित मेळाव्यात बळीराम वराडे यांनी केले. या मेळाव्यात गुजरात टुरिझमचे प्रचारक अभिमन्यू मोदी यांनी या महोत्सवाची माहिती दिली.
गुजरातमधील पंच महल जिल्ह्यामध्ये हा पंच महोत्सव साजरा केला जातो. हा महोत्सव म्हणजे गुजरातमधील संस्कृतीचा एक भाग आहे. मागील दोन - अडीच वर्षांत कोरोनामुळे कोणतेच महोत्सव होत नव्हते, त्यामुळे टुरिझम व्यवसायही ठप्प झाला होता. पण आता इतर व्यवसायाप्रमाणे टुरिझमही उभारी घेत आहे. त्याअनुषंगाने यावर्षी पंच महोत्सव २५ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२२ यादरम्यान होत आहे. यामुळे या जिल्ह्यातील टुरिझममध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ट्रॅव्हल एजंटनी जास्तीत जास्त बुकिंग करून महोत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन गुजरात टुरिझमच्या महाराष्ट्र प्रमुख श्वेता जुकर यांनी केले.