गांधी मैदान निधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गांधी मैदान निधी
गांधी मैदान निधी

गांधी मैदान निधी

sakal_logo
By

69601

गांधी मैदानाच्या विकासासाठी
१९ कोटींचा निधी द्या ः जयश्री जाधव

कोल्हापूर, ता. १९ ः गांधी मैदानाच्या सर्वांगीण विकासासाठी १९ कोटींचा निधी द्या, अशी मागणी आमदार जयश्री जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आमदार जाधव यांनी याबाबतचे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, गांधी मैदानाचा सर्वांगीण विकास करावा, अशी खेळाडू, क्रीडा प्रेमींची मागणी आहे. मैदानावर पावसाचे पाणी साचून मैदानाला तळ्याचे स्वरूप येते. त्यामुळे पावसाचे पाणी, सांडपाण्याचे निर्गतीकरण गरजेचे आहे. यासह विविध सोयी उपलब्ध करून देण्याकरिता दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांनी आराखडा तयार करून घेतला आहे. यात सांडपाण्याच्या निर्गतीसह सुविधांचा समावेश आहे. महापालिकेकडे तो सादर केला असून, १९ कोटींची आवश्यकता आहे. तो टप्प्याटप्प्याने मंजूर करावा. कोल्हापूरच्या खेळाडूंना सरावासाठी उत्तम सुविधा मिळाल्या, तर ते जागतिक स्तरावर चमकू शकतात. मुख्यमंत्री शिंदे यांनी निधी देण्याचे आश्वासन दिले.