
यसबा करंडक चाटे शिक्षण समूहाकडे
69613
यसबा करंडक चाटे शिक्षण समूहाकडे
कोल्हापूर, ता. १९ ः ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग व यशवंत भालकर फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने यसबा करंडक आंतरशालेय कला महोत्सव नुकताच रंगला. त्यामध्ये चाटे शिक्षण समूहाने यसबा करंडकावर नाव कोरले. विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, प्रा. नंदकुमार रानभरे, जनसंपर्क अधिकारी अलोक जत्राटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवाला प्रारंभ झाला.
चित्रकला, निबंध, एकपात्री, समूह नृत्य, समूह गायन या पाच कला प्रकारामध्ये १५ शाळेचे सुमारे २९० विद्यार्थी सहभागी झाले. संजय तोडकर, किरण पोटे, गौरी चिले, महेश पाटील, भाग्यश्री कालेकर, महेश हिरेमठ, वेदा सोनूले, व्यंकटेश बिदनूर, मनीपद्म हर्षवर्धन यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव विलास शिंदे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी, अभिनेते नितिन कुलकर्णी, रेखा भालकर, सुनील घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती. फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप भालकर, उपाध्यक्ष सपना भालकर, नृत्य दिग्दर्शक संग्राम भालकर यांनी संयोजन केले. अर्चना शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.
चौकट
विविध स्पर्धांचा अनुक्रमे निकाल
-चित्रकला ः विमला गोयंका इंग्लिश स्कूल, छत्रपती शाहू विद्यालय, चाटे स्कूल, प्रायव्हेट हायस्कूल.
-निबंध ः वसंतराव चौगुले इंग्लिश स्कूल, विमला गोयंका इंग्लिश स्कूल, चाटे स्कूल, एकलव्य इंग्लिश स्कूल, छत्रपती शाहू विद्यालय
-एकपात्री ः न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल, संजीवन पब्लिक स्कूल, चाटे स्कूल, वि. स. खांडेकर प्रशाला, नेहरू विद्यामंदिर (कोतोली), वसंतराव देशमुख हायस्कूल
-समूह गीत ः श्री बालाजी हायस्कूल (इचलकरंजी), वसंतराव चौगुले इंग्लीश स्कूल, संजीवन पब्लीक स्कूल, वि. स. खांडेकर प्रशाला, प्रायव्हेट हायस्कूल.
-समूह नृत्य ः श्री बालाजी हायस्कूल, चाटे स्कूल, वसंतराव देशमुख हायस्कूल.