राज्य नाट्य निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्य नाट्य निकाल
राज्य नाट्य निकाल

राज्य नाट्य निकाल

sakal_logo
By

69619
....
राज्य नाट्य स्पर्धेत ‘बॅलन्स शीट’ची बाजी

‘जंगल जंगल बटा चला है’ नाटक दुसरे

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ ः येथे नुकत्याच झालेल्या राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल आज जाहीर झाला. श्री जयोस्तुते युवक मंडळाच्या ‘बॅलन्स शीट’ या नाटकाने पहिला तर परिवर्तन कला फौंडेशनच्या ‘जंगल जंगल बटा चला है’ या नाटकाने दुसरा क्रमांक पटकावला. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली. दरम्यान, इचलकरंजीच्या रंगयात्रा नाट्य संस्थेच्या ‘मोठा पाऊस आला आणि...’ या नाटकाला तिसरा क्रमांक मिळाला. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आज सायंकाळी निकाल जाहीर केला आणि त्याची माहिती मिळताच विजेत्या संघांनी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहावर आनंदोत्सव साजरा केला.
दरम्यान, येथील केंद्रावर एकूण १९ प्रयोग सादर झाले होते. जुगलकिशोर ओझा, सुरेश चव्हाण, राजीव मोहोळकर यांनी परीक्षक तर प्रशांत जोशी यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.
...
-इतर अनुक्रमे पारितोषिके अशी
० दिग्दर्शन ः विद्यासागर अध्यापक (बॅलन्स शीट), किरणसिंह चव्हाण (जंगल जंगल बटा चला है)
० प्रकाश योजना ः शंतनू पाटील (जंगल जंगल बटा चला है), रोहन घोरपडे (मोठा पाऊस आला आणि...)
० नेपथ्य ः ओंकार पाटील (जत्राट एंटरटेन्मेंट लि.), संजय हळदीकर (द केअर टेकर)
० रंगभूषा ः निरंजन मगदूम (जंगल जंगल...), सदानंद सूर्यवंशी (मोठा पाऊस...)
० उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक ः प्रमोद पुजारी (बॅलन्स शीट),कादंबरी माळी (मोठा पाऊस...)
० अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र ः रितिका राजे (जंगल जंगल...), आसावरी नागवेकर (बॅलन्स शीट), शीतल पाखरे (गटार), अर्णवी उपराटे (एस आय ब्लीड), वर्षा अष्टेकर (हमिदाबाईची कोठी), राजन जोशी (द केअर टेकर), सुभाष टाकळीकर (मगरमिठी), आत्माराम पाटील (एक्सपायरी डेट), अनिल कांबळे (डबल गेम), अनिरूध्द भागवत (फॉर रेंट).