डान्सिंग सांता अन्‌ गव्हाणीची मुर्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डान्सिंग सांता अन्‌ गव्हाणीची मुर्ती
डान्सिंग सांता अन्‌ गव्हाणीची मुर्ती

डान्सिंग सांता अन्‌ गव्हाणीची मुर्ती

sakal_logo
By

70082
कोल्हापूर : नाताळ सणाच्या पाश्‍‍र्वभूमीवर बिंदू चौक येथे सांता कॅपची विक्री करताना.

नाताळला म्युझिकल सांताचे आकर्षण

कोल्हापूर, ता. २२ : एका हातात सॅक्सोफोन घेऊन सॅक्सोफोनमधून अनवट धून साकारणारा म्युझिकल सांताचा स्टॅच्यू हा नाताळमधील खरे आकर्षण असणार आहे. नाताळशी संबंधित वस्तूंनी पापाची तिकटी बहरलेली दिसत आहे. ख्रिसमस ट्रीच्या सजावट करण्यासाठी काही आगळ्या वेगळ्या वस्तू आलेल्या पाहायला मिळतात. रंगबिरंगी ड्रम्स‌, पाईन ट्री, लाईट ट्रीचे आकर्षण आहे. गिफ्ट पॉकेटच्या स्वरुपात ट्री डेकोरेशनसाठी वस्तू ठेवलेल्या पाहायला मिळतात. ५० रुपयाला एक जोडी याप्रमाणे विक्री सुरू आहे.
म्युझिक सांताचा स्टॅच्यू दहा हजार रुपयांना असून, तो पाहण्यासाठी अन्‌ घेण्यासाठी गर्दी होणार आहे. रेनडिअरचे पुतळे, बेथेलहेममधील स्टार, चांदण्याही लक्ष वेधून घेत आहेत.

चौकट
गव्हाणी म्हणजे काय?
येशू ख्रिस्त यांचा जन्म गुरांच्या गोठ्यात झाला. याचे प्रतीक म्हणून बेथेलहेमच्या गोठ्याची प्रतिकृती (क्रीब) बनविली जाते. अशा प्रतिकृती प्रत्येक ख्रिस्ती कुटुंबात नाताळच्या आधी तयार केल्या जातात. त्यामध्ये जोसेफ, मरिया आणि येशू बाळाच्या प्रतिमा ठेवल्या जातात. संत फ्रान्सिस यांनी १२३३ मध्ये आपल्या असिसी गावी सर्वप्रथम बेथलेहेमातील गोठ्याची प्रतिकृती तयार केली. तेव्हापासून ही प्रथा जगभर रूढ झाली. येशू ख्रिस्त बेथेलहेममधील एका गव्हाणीत एक बाळ म्हणून पृथ्वीवर आला. यासाठी गव्हाणीतील ठेवलेली येशूची मूर्ती, गव्हाणीच्या मार्बलच्या मूर्ती, रंगीत कागदी चित्रे असलेल्या मूर्तीही विक्रीस आल्या आहेत. शिवाय सांताचे कटआऊटस्‌, सांताचे छापील कार्डस्‌ घेण्यासाठी गर्दी होत आहे.
...
कोट
यावर्षी नाताळचा उत्सव आनंदाने साजरा केला जात आहे. नाताळच्या वस्तूंमध्ये विविधता आहे. या सर्व वस्तू मुंबई, पुण्यातून आणल्या जातात. या सर्व वस्तूंमध्ये २० टक्के वाढ झाली आहे.
-जयदीप साळोखे, पापाची तिकटी.