काही बातम्या एकत्रित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काही बातम्या एकत्रित
काही बातम्या एकत्रित

काही बातम्या एकत्रित

sakal_logo
By

राष्ट्रभाषा हिंदी परीक्षा फॉर्मची
अंतिम मुदत २५ जानेवारीपर्यंत
कोल्हापूर : महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणेतर्फे शनिवारी (ता. २५) आणि रविवारी (ता. २६ फेब्रुवारी) होणाऱ्या राष्ट्रभाषा हिंदीच्या विविध परीक्षासाठी फॉर्म भरण्याची अंतिम तारीख २५ जानेवारी निश्चित केलेली आहे. सभेच्या राष्ट्रभाषा हिंदी बालबोधिनी, प्राथमिक, प्रवेशिका, सुबोध, प्रबोध, प्रवीण, पंडित, संभाषण योग्यता आदी परीक्षांसाठी इच्छुक विद्यार्थी २५ जानेवारीपर्यंत फॉर्म भरू शकतात. परीक्षा ऑफलाईन होतील. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील हिंदी विषय प्रमुखांशी त्वरित संपर्क साधून नोंदणी करावी. तसेच ज्यांना बहिस्थ: फॉर्म भरावयाचे आहेत, त्यांनी कोल्हापूर विभागीय समितीचे अध्यक्ष डॉ. नारायण केसरकर, हिंदी प्रचार केंद्र, २६६० ''ए'' वॉर्ड, खानापिना हॉटेल मागे, बिनखांबी गणपती मंदिराजवळ संपर्क साधावा, असे आवाहन कोल्हापूर विभागीय समितीने पत्रकाद्वारे केले आहे.
...
न्यू प्राथमिक विद्यालयात मिनी बझार
कोल्हापूर : न्यू प्राथमिक विद्यालयात मिनी बझारचे आयोजन केले. अधीक्षक एस. एस. पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. मुख्याध्यापिका एस. डी. खंडागळे यांनी स्वागत केले. चौथीच्या विद्यार्थ्यांनी वस्तू, फळे, भाज्या, खेळणी, इमिटेशन ज्वेलरी, खाद्यपदार्थांची मांडणी करुन मिनी बझार फुलविला. प्रत्यक्ष व्यापाराच्या अनुभवातून विद्यार्थ्यांचे व्यावहारिक जीवनकौशल्य विकसित व्हावे, त्यांना स्वयं-रोजगाराची संधी मिळून संवाद कौशल्य वाढीस लागावे, यासाठीच सकाळपासून स्टॉल सजले. ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी आकर्षक जाहिरात केली होती. प्लास्टिकचा वापर करु नका, कचरा कचरापेटीतच टाका, स्वच्छता राखा, शांतता राखा, यासारखे सूचना फलक लावले. पहिली ते चौथीचे सर्व विद्यार्थी, सर्व शाखांचे शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी भेट दिली. संस्थेचे आजीव सेवक उदय पाटील उपस्थित होते.