
ख्रिसमस फेस्टिव्हलनिमित्त विविध कार्यक्रम
ख्रिसमस फेस्टिव्हलचे
इचलकरंजीत आयोजन
इचलकरंजीः येथील शांतिदूत सेवा संस्थेमार्फत आवळे मैदान येथे यंदाही ख्रिसमस फेस्टिव्हल होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. गुरुवारी (ता. २२) सूरज प्रेमानी (गुजरात), शुक्रवारी (ता. २३) मनोज तेलोरे (सोलापूर) यांचे, तर शनिवारी (ता. २४) सायंकाळी सात वाजता अनिल पाटील यांचे प्रवचन होणार आहे. या कालावधीत शहर व परिसरातील चर्चमधील लहान चिमुकल्यांचे अॅक्शन साँग होणार आहे. त्यामध्ये प्रत्येक चर्चमधील युवकांनी एकत्र येऊन शांतिदूत यूथ क्वायर टीमचे आयोजन केलेले आहे. फेस्टिव्हल ठिकाणी मैदानामध्ये येणाऱ्या रसिकांसाठी खाद्य पदार्थांचे स्टॉल, खेळणी, पाळणे, बुक स्टॉल व इतर मनोरंजनाची खैरात असणार आहे. दररोज सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत फेस्टिव्हल सुरू राहणार आहे. या दरम्यान, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सेवकांना शांतिदूत आरोग्य सेवा पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार, धर्मसेवा पुरस्कार आणि उद्योगभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती संस्थेचे अध्यक्ष अब्राहम आवळे यांनी दिली.