मोफत शिबीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोफत शिबीर
मोफत शिबीर

मोफत शिबीर

sakal_logo
By

हाडे तपासणी शिबिरास प्रतिसाद
कोल्हापूर : देवस्थान व्यवस्थापन समिती, संचेती इन्टिट्यूट फॉर ऑर्थोपेडिक सेंटरच्या सहकार्याने मोफत हाडे तपासणी शिबिर झाले. देवस्थान समिती कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय, नागरिकांसाठी विशेष शिबिर घेतले. यामध्ये सुमारे ३०० रुग्णांनी सहभाग घेतल्याची माहिती डॉ. कैलास पाटील, देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुणे येथील संचेती हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक नवीन ग्रीन आणि हायटेक १२ मजली इमारतीचे काम पूर्ण होत असून येथे ऑर्थो, स्पाइन, न्यूरोसर्जरी, रोबोटिक गुडघे आणि खुबा रोपण आणि रोबोटिक ओ आर्म स्पाइन सर्जरी यासह ८ हायटेक ऑपरेशन थिएटर असणार आहेत, असे पाटील यांनी सांगितले. संचेती हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टरांनी अत्याधुनिक मशीनद्वारे तपासणी केली. डॉ. भूषण पाटील, दिगंबर माळी, सुयश पाटील, सोमनाथ नवगने उपस्थित होते.