शिवाजी पूल आयलॅंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजी पूल आयलॅंड
शिवाजी पूल आयलॅंड

शिवाजी पूल आयलॅंड

sakal_logo
By

70169

छत्रपती शिवाजी पूल चौक
सुशोभीकरणाला सुरूवात

कोल्हापूर, ता. २१ ः छत्रपती शिवाजी पूल चौकाच्या सुशोभीकरणाचे काम महापालिकेने सुरू केले. याबाबत जीवदान सेवाभावी संस्थेने पाठपुरावा केला होता.
छत्रपती शिवाजी पूल चौक परिसरातील जुना आयलॅंड पर्यायी शिवाजी पुलावरील वाहतुकीचे कारण देत महापालिकने हटविला होता. हा गोलाकार आयलँड बसविण्याचे निश्चित झाले होते. परंतु, त्याची पूर्तता करण्यात आली नव्हती. याबाबत जीवदान संस्थेचे अरूण खोडवे यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. वाहनधारकांची कुचंबना होत असून, अपघात घडत आहेत. तसेच परिसर अंधारात असल्याची तक्रारही केली होती. पूर्वीप्रमाणे आयलँडची व्यवस्था करून स्ट्रिट लाईट बसवून वाहनधारक, पादचाऱ्यांची गैरसोय दूर करावी. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला होता. त्यानुसार महापालिकेने नवीन आयलँड बसवण्यासाठी तसेच चौक सुधारण्यासाठी डिझाइन तयार करून घेतले. त्यानुसार कामाला सुरूवात केली आहे.