मनपा शाळेस टिव्ही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनपा शाळेस टिव्ही
मनपा शाळेस टिव्ही

मनपा शाळेस टिव्ही

sakal_logo
By

70111

महाराष्ट्र विद्युत पारेषणतर्फे महात्मा फुले विद्यालयास १३ स्मार्ट टीव्ही

कोल्हापूर, ता. २१ ः महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या सीएसआर निधीतून महापालिकेच्या फुलेवाडी येथील महात्मा फुले विद्यालयास चार लाखांचे १३ स्मार्ट टीव्ही देण्यात आले.
कराड परिमंडलच्या मुख्य अभियंता शिल्पा कुंभार प्रमुख पाहुण्या होत्या. अध्यक्षस्थानी सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर होते. कुंभार म्हणाल्या, ‘‘सध्याचे डिजिटल युग असल्याने या स्मार्ट टीव्हीचा उपयोग विद्यार्थ्यांना होणार आहे. अभ्यासक्रमातील विविध घटक व्हिडिओ, ऑडिओद्वारा अनुभवात येणार आहेत.’’ औंधकर, एस. के. यादव यांनी मनोगत व्यक्त केले. गोविंद पानसरे विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका माधुरी मातले यांनी शाळेस प्रिंटर भेट दिला.
अधीक्षक अभियंता प्रांजल कांबळे, कार्यकारी अभियंता अभिजित धमाले, ऋग्वेदा माने, विजय माळी, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा गीता सूर्यवंशी, पानसरे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशालता कांझर, तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते. मुख्याध्यापिका अनुराधा शिंत्रे यांनी प्रास्ताविक केले. स्वाती चौगले यांनी सूत्रसंचालन केले. तुषार भापकर यांनी आभार मानले.