
गुन्हेगारी संक्षीप्त वृत्त
शेणवडेत तरुणाला मारहाण
कोल्हापूर ः शेणवडे (ता. गगनबावडा) येथे निवडणूक वादातून अंकुश सर्जेराव वापीलकर (वय २६) याला मारहाण झाली. निवडणुकीचा निकाल लागल्यावर विजयी उमेदवाराच्या बाजूने काही जणांनी जल्लोष केला. याचा राग मनात धरून अंकुशला मारहाण करण्यात आली. दगडाने मारहाण केल्याने तो जखमी झाला. उपचारांसाठी त्याला ‘सीपीआर’मध्ये दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
....
एसटीच्या धडकेत प्रवासी जखमी
कोल्हापूर ः मध्यवर्ती बसस्थानक येथे एसटीची धडक लागून प्रवासी जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला उपचारांसाठी ‘सीपीआर’मध्ये दाखल करण्यात आले. सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
...
रिक्षा उलटल्याने चालक जखमी
कोल्हापूर ः मोरेवाडी परिसरात रिक्षा उलटून चालक जखमी झाला. किसन भीमराव पवार (वय ५५, रा. महाडिक कॉलनी) असे त्यांचे नाव आहे. सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. जखमी अवस्थेत त्यांना उपचारांसाठी ‘सीपीआर’मध्ये दाखल करण्यात आले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.