ए. डी. शिंदे इंजिनिअरिंगमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ए. डी. शिंदे इंजिनिअरिंगमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत
ए. डी. शिंदे इंजिनिअरिंगमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत

ए. डी. शिंदे इंजिनिअरिंगमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत

sakal_logo
By

GAD2112.JPG
70126
भडगाव : डॉ. ए. डी. शिंदे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत प्रसंगी स्वाती कोरी, मुरारी चिकोडे, रोनक हंजी, के. एस. जोशी, ए. एस. शेळके आदी.
---------------------------------------------------------------
ए. डी. शिंदे इंजिनिअरिंगमध्ये
नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत
गडहिंग्लज, ता. २५ : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील डॉ. ए. डी. शिंदे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. संस्थेच्या सचिव स्वाती कोरी प्रमुख पाहुण्या तर माजी विद्यार्थी व चिकोडे स्टीलचे प्रमुख मुरारी चिकोडे व निर्मिती कन्स्ट्रक्शनचे रोनक हंजी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सौ. कोरी म्हणाल्या, ‘उच्च व दर्जेदार शिक्षणासाठी आपली संस्था नेहमी विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहील. त्याचा लाभ घेवून विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी वाटचाल करावी. श्री. चिकोडे यांनी नोकरीच्या मागे न लागता स्वत:चा व्यवसाय सुरु करुन आपला व समाजाचा विकास साधावा, असे आवाहन केले. प्राचार्य के. एस. जोशी, पॉलिटेक्नीकचे प्राचार्य ए. एस. शेळके यांनी मार्गदर्शन केले. प्रथम वर्षाच्या प्रथमेश खोत व किर्ती तंगडी या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. श्री. जोशी यांनी स्वागत केले. शरद किल्लेदार व हेमलता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एस.टी. बरगे यांनी आभार मानले. संस्थेचे अध्यक्ष श्रीपतराव शिंदे, सल्लागार महेश कोरी यांचे मार्गदर्शन मिळाले.