शिवजयंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवजयंती
शिवजयंती

शिवजयंती

sakal_logo
By

शिवजयंतीनिमित्त शिवाजी तरुण
मंडळातर्फे विविध उपक्रमः चव्हाण

कोल्हापूर,  ता. २३ :  १९ फेब्रुवारीला होणाऱ्या  शिवजयंतीनिमित्त  शिवाजी तरुण मंडळातर्फे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.   १९ फेब्रुवारीला  सकाळी १० वाजता शिवजन्मकाळ आणि दुपारी मिरवणूक असल्याचे मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण यांनी सांगितले. शिवाजी मंदिरातील बैठकीत ते बोलत होते
१९  फेब्रुवारी ही शासनाने जाहीर केलेली शिवजयंतीची तारीख आहे. याच दिवशी शिवजयंती करण्याची परंपरा शिवाजी तरुण मंडळाने सुरू केली आहे. जिल्ह्यातील इतरही  मंडळांनी याच दिवशीशिवजयंती साजरी करावी असे आवाहन मंडळाचे सचिव महेश जाधव यांनी केले. उभा मारुती चौकात किल्ल्याची प्रतिकृती असलेले भव्य स्टेज उभारण्यात येणार आहे. या स्टेजवरून  शिवव्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. मिरवणुकीच्‍या उदघाटनासाठी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, जिल्ह्यातील खासदार आमदार, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी,  जिल्हा पोलिस अधीक्षक,  महापालिका अधिकारी यांना निमंत्रित केले आहे.
मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्यासोबत पौराणिक, ऐतिहासिक देखावे आणि शिवपराक्रम दर्शवणारे फलक,  स्थानिक समस्यावर आवाज उठवणारे फलक, मावळ्यांचे  वेषातील तरुण,  धनगरी ढोल, झांज व लेझीम पथक, मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके, झेंडे ,पताका यांचा समावेश असेल.
उपाध्यक्ष अजित राऊत, चंद्रकांत साळोखे,  लाला गायकवाड, राजेंद्र चव्हाण , शरद नागवेकर, पापा जाधव, श्रीकांत भोसले, विजय माने, विशाल बोंगाळे उपस्थित होते.