किसान संघ आंदोलन बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किसान संघ आंदोलन बातमी
किसान संघ आंदोलन बातमी

किसान संघ आंदोलन बातमी

sakal_logo
By

70159
...

कृषी उपकरणे, साहित्यावर जीएसटी नको
---
भारतीय किसान संघाची मागणी; दिल्लीत आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ ः शेतीसाठी लागणारी उपकरणे, साहित्य यावरील जीएसटी रद्द करावा. त्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च कमी होईल. यासह अन्य मागण्यांसाठी किसान संघाने दिल्ली येथील रामलीला मैदानावर किसान गर्जना रॅलीचे आयोजन केले होते. यात कोल्हापुरातून मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
या रॅलीला मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय किसान संघाचे अखिल भारतीय अध्यक्ष साई रेड्डी, संघटनमंत्री दिनेश कुलकर्णी व इतर वरिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. विविध राज्यांतील पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव या वेळी उपस्थित होते. कोल्हापुरातील आजरा, चंदगड, करवीर, शाहूवाडी यासह अन्य तालुक्यांतून मोठ्या संख्येने शेतकरी बांधव सहभागी झाले होते.
या वेळी महाराष्ट्राचे संघटनमंत्री चंदन पाटील म्हणाले, की रॅलीमुळे केंद्र सरकारचे लक्ष शेतकऱ्यांकडे वेधले गेले असून, मागण्या मान्य झाल्यास देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. किसान संघाचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ शिंदे म्हणाले, की शेती उपकरणे आणि आवश्यक साहित्यावरील जीएसटी रद्द झाल्यास देशभरातील शेतकऱ्यांना लाभ होईल. या रॅलीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही लाभ होणार आहे.
-------------------

किसान संघाच्या प्रमुख मागण्या ः
- शेतकरी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने आणि तो एक प्रकारे सेवा देत असल्याने कृषी उपकरणे व साहित्यावरील जीएसटी रद्द करावा. हा जीएसटी काढून टाकल्याने उत्पादन खर्च कमी होईल.
- शेतकऱ्यांच्या उत्पादनांना एमएसपी देणे. प्रत्येक उत्पादन आणि उद्योगातील उत्पादनांना एमआरपी आहे, त्यामुळे शेतमालाला निश्चित मूल्य असले पाहिजे.
- शेतकरी सन्मान निधीत भरघोस वाढ करावी. त्यामुळे शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना त्याचा उपयोग होईल.
- जेनेटिकली मॉडिफाइड बियाण्यांना सरकारने परवानगी देऊ नये. एकदा ही बियाणे आपल्या अन्नसाखळीत आणि वातावरणात आली की त्यामुळे शेतीला नुकसान होईल.