कॉंक्रिट रस्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कॉंक्रिट रस्ता
कॉंक्रिट रस्ता

कॉंक्रिट रस्ता

sakal_logo
By

70185

रस्ता पॅचवर्कसाठी केमिकल
काँक्रीटचा महापालिकेचा प्रयोग
कोल्हापूर, ता. २१ ः महापालिकेने भाऊसिंगजी रोडवरील एक खड्डा डांबरीकरणापेक्षा स्वस्त तसेच मजबूत असलेल्या केमिकल काँक्रीटने आज प्रायोगिक तत्त्वावर भरला. पुण्यातील अभियंत्याने या काँक्रीटची निर्मिती केली असून, पुण्यात त्या काँक्रीटने अनेक खड्डे बुजविले असल्याचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले.
शहरातील खड्डे भरण्यासाठी महापालिकेचा डांबर प्लॅंट नसल्याने पॅचवर्कचेही ठेके द्यावे लागत आहेत. त्यातून अनेक रस्त्यांवरील खड्डे भरले जात नसल्याचे शहरवासीय अनुभवत आहेत. महापालिका मोठी खडी व डांबराने काही खड्डे भरत आहेत. त्याला पर्याय म्हणून टिकाऊ व स्वस्त असलेले हे केमिकल कॉंक्रीट वापरून पाहावे, असे कॉमनमॅन संघटनेने सुचविले होते. त्यानुसार सरनोबत यांनी पाठपुरावा करून एक खड्डा प्रायोगिक तत्त्वावर भरण्यासाठी ते केमिकल मागविले. आज रात्री वाहतूक थोडी कमी झाल्यावर भाऊसिंगजी रोडवरील एक खड्डा त्या काँक्रीटने भरला. त्यासाठी प्रथम खड्ड्यात केमिकल टाकले. त्यावर काँक्रीट टाकले. त्यानंतर केमिकल टाकलेले काँक्रीट त्यावर पसरले. ते भरल्यावर ७० मिनिटांनंतर त्यावरून वाहतूक केली जाऊ शकते. या वेळी कॉमनमॅन संघटनेचे ॲड. बाबा इंदुलकर, अन्य अधिकारी उपस्थित होते.