जैन समाजाने व्यापार बंद ठेऊन आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जैन समाजाने व्यापार बंद ठेऊन आंदोलन
जैन समाजाने व्यापार बंद ठेऊन आंदोलन

जैन समाजाने व्यापार बंद ठेऊन आंदोलन

sakal_logo
By

७०१४०
सम्मेद शिखरजी तीर्थस्थळ घोषित करा
जैन बांधवांची मागणी; व्यापार बंद ठेवून निषेध

कोल्हापूर, ता. २१ ः झारखंड राज्यातील सम्मेद शिखरजी जैन बांधवांचे तीर्थक्षेत्र आहे. मात्र झारखंड सरकारने त्याला पर्यटनस्थळाचा दर्जा दिला आहे. याचा निषेधासाठी आज जैन बांधवांनी शहरातील दुकाने बंद ठेवली. या बंदमुळे जिल्ह्यातील १५० कोटींची उलाढाल ठप्प झाली. याबाबतचे निवेदनही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
निवेदनातील माहितीनुसार, ‘सम्मेद शिखरजी जैन धर्मियांचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. येथे दरवर्षी लाखो जैन भाविक जातात. हे तीर्थक्षेत्र जैन धर्मियांच्या आस्थेचे केंद्र आहे. मात्र झारखंड सरकारने याला पर्यटन दर्जा दिल्याने येथील पावित्र्य नष्ट होणार आहे. त्यामुळे सरकारने तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी हे निवेदन स्वीकारले. यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे खजानीस संजय शेटे, दिगंबर जैन बोर्डिंगचे अध्यक्ष सुरेश रोटे, माजी नगरसेवक ईश्वर परमार, पारस ओसवाल, राजेंद्र शहा, कांतीलाल संघवी, जवाहर गांधी, भरत वणकुद्रे, सुरेश मगदूम, संतोष लाड, प्रफुल्ल चमकले, संजय कोठावळे उपस्थित होते. दरम्यान आज जैन बांधवांनी शहरातून रॅली काढली. गुजरी, लक्ष्मीपुरी, शाहूपुरीतील जैन बांधवांनी दुकाने, व्यापारी पेठा बंद ठेऊन कडकडीत बंद पाळला. परिसरात मोठ्या प्रमाणात दुकाने बंद असल्याने दिवसभर शांतता होती. जैन बांधवांनी वसगडे येथे मूक मोर्चा काढला. इचलकरंजी, जयसिंगपूर, रांगोळी, रूकडी, माणगाव, मांगूर, किणी येथे निषेध फेरी काढण्यात आली.