मनपा सदस्यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनपा सदस्यांचा सत्कार
मनपा सदस्यांचा सत्कार

मनपा सदस्यांचा सत्कार

sakal_logo
By

पहिल्या सभागृहातील पदाधिकारी,
सदस्यांचा आज होणार सन्मान

कोल्हापूर, ता. २१ : सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनाचे औचित्त्य साधून महापालिकेतर्फे उद्या (ता. २२) पहिल्या सभागृहातील व नगरपालिकेतील शेवटच्या सभागृहातील माजी पदाधिकारी, सदस्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
महापालिका स्थापन होण्यापूर्वीचे १९७२ चे शेवटचे सभागृह व महापालिका स्थापन झाल्यानंतर १९७८ च्या पहिल्या सभागृहातील माजी पदाधिकारी, माजी सदस्यांचा प्रशासक डॉ. कांदबरी बलकवडे यांच्या हस्ते हा सन्मान होईल. १ जुलै १९६७ ते १५ डिसेंबर १९७२ कालावधीतील नगरपालिकेत प्रतिनिधीत्व केलेले प्रल्हाद चव्हाण, नजीर महंम्मद बागवान, शिवाजीराव कदम या तिघांचा सन्मान होणार आहे. तर १ जुलै १९७८ ते १५ डिसेंबर १९८२ कालावधीतील महापालिकेच्या पहिल्या सभागृहात असलेले चंद्रकांत साळोखे, शंकरराव वाघ, उमेश चोरगे, आनंदराव पायमल, अशोक जामसांडेकर, आर. के. पोवार, ॲड. महादेवराव आडगुळे, सदाशिवराव बसुगडे, शिवाजीराव कदम, शरद सामंत, अशोक भंडारे, गौतम जाधव, मोहन हवालदार यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. महापालिकेच्या माजी सदस्यांनी, नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.