
विशाळगड शिवसैनिकांना अडवले
L70177
...
विशाळगडाकडे निघालेल्या
शिवसैनिकांना पोलिसांनी रोखले
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ ः किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणे काढून टाकण्यासाठी कुदळ, फावडी घेऊन निघालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी आज रोखले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून ही मंडळी विशाळगडाकडे जात असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, याबाबत जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, रविकिरण इंगवले, दत्तात्रय टिपुगडे, शशिकांत बिडकर, राजेंद्र पाटील, मुरलीधर जाधव यांच्यावर लक्ष्मीपुरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे काढावीत, यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून वारंवार पाठपुरावा सुरू आहे. मात्र, अतिक्रमणे काढली जात नसल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसैनिकांनी स्वतःच अतिक्रमणे काढण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शासनाकडून जाणीवपूर्वक दडपशाही केली जात आहे. त्यामुळे कोणतीही पूर्वसूचना प्रशासनाला न देता गनिमी काव्यानेच ही अतिक्रमणे काढली जातील, असा इशारा यावेळी संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव यांनी दिला.