निकाल ग्रामपंचायतींचा, धडकी कंत्राटदारांना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निकाल ग्रामपंचायतींचा, धडकी कंत्राटदारांना
निकाल ग्रामपंचायतींचा, धडकी कंत्राटदारांना

निकाल ग्रामपंचायतींचा, धडकी कंत्राटदारांना

sakal_logo
By

लोगो- जिल्‍हा परिषद/ सरकारनामा

निकाल ग्रामपंचायतींचा
धडकी कंत्राटदारांना...

जलजीवन मिशन राहणार केंद्रस्‍थानी; आता अडवा,जिरवाचे राजकारण

सदानंद पाटीलः सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर,ता.२१:जिल्‍ह्यातील ४२९ ग्रामपंचायतीत निवडणूक झाली. यातील सुमारे २०० ठिकाणी सत्तांतर झाले आहे. अनेक ठिकाणी सत्तेचे त्रांगडे झाले आहे. बहुतांश ग्रामपंचायत निवडणुकीत जलजीवन मिशनमधून आलेल्या ''कमिशन''ने धुरळा उडवला आहे. गावात काम सुरू होण्यापूर्वीच अनेक ठिकाणी ''उचल'' करुन निवडणुकीत कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला आहे. मात्र, सत्ता बदल झाल्याने व सरपंच एकाचा व बहुमत दुसऱ्याचा असा प्रकार घडला आहे. येथे आता जल जवन मिशन योजनेवरुन वादास तोंड फुटणार आहे. ग्रामपंचायतीत लागलेल्या चित्रविचित्र निकालाने कंत्राटदारांना धडकी भरली आहे.
जिल्‍हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने सर्व गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजना राबवण्यास सुरवात केली आहे. लोकप्रतिनिधींचे आत्तापर्यंत रस्‍ते व गटर्स याच भौतिक सुविधांना प्राधान्य राहिले आहे. त्यामानाने पाणी योजनांकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. मात्र जलजीवनसाठी आलेला १२०० कोटींचा निधी, सर्वच गावांसाठी पाणी योजना, यामुळे पहिल्यांदाच लोकप्रतिनिधी व कंत्राटदारांनी या कामात लक्ष घातले. सोयीच्या अटी-शर्ती ठेवून धडाधड अंदाजपत्रक तयार करुन कामे मिळवण्याचा प्रयत्‍न केला. या योजनांच्या अंदाजपत्रकापासून अंमलबजावणीपर्यंत प्रत्येक टप्‍प्यावर उलटसुलट काम झाले आहे. सुरुवातीला महाविकास आघाडीचा या योजनांवर पगडा होता. मात्र, सत्ता बदल झाल्यानंतर भाजप, शिंदे आघाडीच्या नेत्यांनी यात लक्ष घातले आहे. यातूनच निविदा थांबवणे, कंत्राटदारांवर तक्रारी करणे, कामाचे आदेश थांबवणे असे प्रकार सुरू आहेत.
दरम्यानच्या काळात ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या. अनेक सत्ताधाऱ्यांना निवडणुकीसाठी जलजीवनचा आधार मिळाला. आलेल्या टक्‍केवारीने मतांचे दरही चांगलेच वाढवून ठेवल्याची चर्चा रंगली. एवढा आटापिटा करुनही ५० टक्‍के ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले आहे. तसेच उर्वरित ठिकाणीही सत्तेचे त्रांगडे झाले आहे. विरोधकांना सत्तेत येण्यासाठी जल जीवनचा व त्यातील कमिशनचा अडथळा पार करावा लागला. यामुळेच आता नवीन सत्ताधाऱ्यांचा राग हा जलजीवन मिशन योजना व या योजनेच्या कंत्राटदारावर निघण्याची शक्यता आहे.
...
चौकट
काय होवू शकते?
सत्तेत बदलाने कंत्राटदार बदलाची मागणी
कंत्राटदारांवर व कामांवर होणार तक्रारी
जलजीवनसाठी फेरनिविदांचा आग्रह
केलेल्या कामाच्या चौकशीचा प्रयत्‍न
कमिशनसाठी लागणार तगादा
दुहेरी कमिशनने गोत्यात येण्याची शक्यता
...
चार्ट करणे
जलजीवनची योजनांची सद्यस्‍थिती
एकूण योजनांची संख्या-१२३५
प्रकल्‍प अहवाल तयार असणाऱ्या- १२३५
तांत्रिक मान्यता प्राप्‍त योजना- १२२८
प्रशासकीय मान्यता प्राप्‍त योजना- १२२८
काम सुरू करण्याचे आदेश-१०१७
कामे सुरू असलेल्या योजना-८८४
काम पूर्ण झालेल्या योजना-१३३