गड-लोकशिक्षण व्याख्यानमाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड-लोकशिक्षण व्याख्यानमाला
गड-लोकशिक्षण व्याख्यानमाला

गड-लोकशिक्षण व्याख्यानमाला

sakal_logo
By

फोटो क्रमांक : gad2113.jpg

लोगो

गडहिंग्लज : नगरपरिषदेच्या लोकशिक्षण व्याख्यानमालेत बोलताना वैजनाथ महाजन.
---------------------

शिक्षण व्यवस्थेसमोर नवी आव्हाने
वैजनाथ महाजन : नैतिक मूल्यांशी नाळ टिकवायला हवी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २१ : डिजिटल युगात शिक्षण व्यवस्था तांत्रिकतेकडे अधिक झुकू लागली आहे. त्याचे दूरगामी परिणाम भोगावे लागू शकतात. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेसमोरील नवी आव्हाने पेलण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हावे लागेल, असा इशारा वैजनाथ महाजन (सांगली) यांनी दिला. या शिक्षण व्यवस्थेची नाळ समाजातील नैतिक मूल्यांशी टिकवायला हवी, असेही त्यांनी सांगितले.
येथील नगरपरिषदेच्या साने गुरुजी वाचनालयातर्फे लोकशिक्षण व्याख्यानमाला सुरू आहे. या व्याख्यानमालेत महाजन यांनी चौथे पुष्प गुंफताना ‘आपली शिक्षण परंपरा’ या विषयाची मांडणी केली. माजी नगराध्यक्षा मंजूषा कदम अध्यक्षस्थानी होत्या. बॅ. नाथ पै विद्यालयाच्या मैदानावर ही व्याख्यानमाला सुरू आहे.
महाजन म्हणाले, ‘शालेय शिक्षण खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण यावरच भविष्यातील वाटचालीची इमारत उभी राहते. त्यासाठी ते पक्के असणे गरजेचे आहे. शिक्षणाची नाळ समाजाशी तुटली, तर जटिल प्रश्न उभे राहणार आहेत. शिक्षणाचा संबंध समाजातील नैतिक मूल्यांशी जोडलेला हवा. तांत्रिक शिक्षणामुळे हस्तकौशल्ये लोप पावण्याची भीती निर्माण झाली आहे.’
गणपतराव पाटोळे यांनी स्वागत केले. विठ्ठल पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. आश्विनी पाटील यांनी आभार मानले.
...

चौकट

गुणवत्तेची जडणघडण

महाजन म्हणाले, ‘शिक्षण माणसाला खूप काही शिकवते. वर्गातील शिक्षण अधिक महत्त्वाचे आहे. खासकरून गुणवत्तेची जडणघडण करण्यात शिक्षणाचा खूप मोठा वाटा असल्याने शिक्षण अपरिहार्य आहे.’
...

आजचे व्याख्यान
- वक्ते :- दत्ता पाटील (नाशिक)
- विषय :- लोकपरंपरा आणि ढासळते मूल्यमापन
- वेळ :- सायंकाळी साडेसहा वाजता