Mon, Feb 6, 2023

बिलांगा येथे तरुणाला मारहाण
बिलांगा येथे तरुणाला मारहाण
Published on : 21 December 2022, 5:12 am
बाटली मारल्याने तरुण जखमी
कोल्हापूर ः लघुशंका इथे का केली, असा जाब विचारत तरुणाला मारहाण करण्याची घटना बालिंगा येथील नागदेववाडी फाट्याजवळ घडली. या प्रकरणी अनिल पोपट ढेंगे (रा. नागदेववाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. करवीर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगिराज सुभाष सुतार (वय २९, रा. बालिंगा) हा जेवण करून नागदेववाडी फाट्याजवळून निघाला होता. वाटेत तो लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला थांबला. त्यावेळी ढेंगे याने इथे का थांबलास, असा जाब विचारून बाटलीने मारहाण केली. यामध्ये योगिराज हा जखमी झाला.