‘स्वराज्य मल्टिस्पेशालिटी’ चा पहिला वर्धापनदिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘स्वराज्य मल्टिस्पेशालिटी’ चा पहिला वर्धापनदिन उत्साहात
‘स्वराज्य मल्टिस्पेशालिटी’ चा पहिला वर्धापनदिन उत्साहात

‘स्वराज्य मल्टिस्पेशालिटी’ चा पहिला वर्धापनदिन उत्साहात

sakal_logo
By

GAD222.JPG
70223
गडहिंग्लज : स्वराज्य हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त दीपप्रज्वलनप्रसंगी डॉ. अजित पाटोळे, डॉ. सुरेखा पाटोळे, डॉ. अमर पाटील आदी.
-------------------------------------------------------------------
‘स्वराज्य मल्टिस्पेशालिटी’चा
पहिला वर्धापन दिन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २२ : येथील स्वराज्य मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. यानिमित्त सर्व कर्मचारी, रुग्ण व नातेवाइकांना फळांचे वाटप करण्यात आले. लायन्स ब्लड बँकेच्या सहयोगाने रक्तदान शिबिर झाले. त्यात ३४ बॅगा रक्त संकलन करण्यात आले.
हॉस्पिटलचे संचालक डॉ. अजित पाटोळे म्हणाले, की १०० खाटांचे स्वराज्य हॉस्पिटल २४ तास रुग्णसेवेत आहे. कोरोनात २३० हून अधिक रुग्णांना जीवदान दिले. महात्मा फुले आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतून गरीब रुग्णांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया सुरू आहेत. ईसीएसएस योजनेतून माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी उपचार केले जातात. हॉस्पिटलमध्ये लवकरच सोनोग्राफी सुविधा, गायनॅक, एनआयसीयू, डायलिसीस विभाग सुरू करणार असून, सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे हॉस्पिटलची वाटचाल यशस्वीपणे सुरू आहे.
या वेळी डॉ. अमर पाटील, डॉ. सैंदाणी, डॉ. अजित करजगी, डॉ. मंगेश बल्लाळ, डॉ. सुरेखा पाटोळे, डॉ. स्नेहल कांबळे, डॉ. सिद्धी पेडणेकर, डॉ. नेहा बुरुड आदी उपस्थित होते. संचालिका डॉ. सुरेखा पाटोळे यांनी आभार मानले.