श्रावणी चावरे मिस गोखले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रावणी चावरे मिस गोखले
श्रावणी चावरे मिस गोखले

श्रावणी चावरे मिस गोखले

sakal_logo
By

70333

श्रावणी चावरे मिस गोखले
कोल्हापूर, ता. २२ ः गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालयात श्रीमती सुशिलादेवी देसाई युवती सचेतना फाउंडेशनतर्फे आयोजित मानाच्या मिस गोखले स्पर्धेत श्रावणी चावरे हिने मिस गोखलेचा किताब पटकावला. फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रा. डॉ. मंजिरी मोरे, अंजली देसाई व स्मिता सावंत - मांडरे, रश्मी साळगांवकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. मिस गोखले स्पर्धेत फस्ट रनर समृद्धी मुरगुडकर, सेंकड रनर मयुरी मिरजे, बेस्ट स्माईल संचिता जाधव, बेस्ट कॉन्फीडंन्स कल्याणी मलकर, समीक्षा पाटील, बेस्ट हेअर सादिया आळतेकर यांनी किताब पटकावले.
प्रा. डॉ. मोरे यांनी मिस गोखले स्पर्धेच्या माध्यमातून युवतींना व्यक्तीमत्व विकास, सर्वांगीण विकासाची प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले. परिचय, टॅलेंट राऊंड, सामान्यज्ञान स्पर्धा, रायटींग राऊंड अशा फेऱ्यांमध्ये रंगली. प्रा. डॉ. मोरे, प्रा. एम. एम. कामत, प्रा. एस. एस. नागण्णावर, प्रा. एम. एल. धनवडे, प्रा. एस. ए. स्वामी प्रा. एस. आर. गडदे, प्रा. ए. यु. पडवळ यांनी परीक्षण केले. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. जयकुमार देसाई, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलत देसाई, प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर, प्रा. प्रमोद झावरे, बाळ डेळेकर, सुनील देसाई, अजित मोरे, प्रा. आर. एच. पायमल उपस्थित होते. प्रा. परीनाज मुजावर, प्रा. रूबिना मुल्ला, संपदा लोहार यांनी सूत्रसंचालन केले. आभार प्रा. रूबीना मुल्ला यांनी मानले.