जाहिरात बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जाहिरात बातमी
जाहिरात बातमी

जाहिरात बातमी

sakal_logo
By

चिपडे सराफातर्फे
रविवारपासून मोती महोत्सव

कोल्हापूर, ता. २२ : गोपीनाथ अनंत चिपडे सराफ आयोजित मोती महोत्सव रविवार (ता. २५) पासून सुरू होणार आहे. भाऊसिंगजी रोड, भवानी मंडप येथील सराफ पेढीमध्ये होणाऱ्या या महोत्सवामध्ये मोत्याचे सोन्याचे दागिने हे ग्राहकांसाठी आकर्षण ठरतील, अशी माहिती पेढीचे संचालक बन्सीधर चिपडे व मुरलीधर चिपडे यांनी दिली. चिपडे सराफांचा मोती महोत्सव या ग्राहकांसाठी दरवर्षी उत्सुकतेचा विषय असतो. भारतातल्या बाजारपेठांसह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मोत्याच्या दागिन्यांच्या असंख्य व्हरायटीज या महोत्सवात मिळत असल्याने महिलावर्ग या महोत्सवाची वाट पहात असतो. महोत्सवात तीन हजार रूपये आणि त्या पुढील दागिने खरेदीवर आकर्षक भेटवस्तू ग्राहकांना मिळणार आहे. पारंपरिक महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने जसे चिंचपेटी, कुड्या, मोत्याचे तोडे, तन्मणी, नेकलेस, बाजूबंद, मोत्याचे वेल बरोबरच जोधपुरी, जयपुरी, हैद्राबादी, कुंदन, स्वोरोस्की, तैवानी पर्ल्स, बियाको पर्ल्स, कलकत्ती, रजवाडी, केशी मोती, साऊथ इंडियन, कारवारी, ऑक्सडाईझ पर्ल्स, ऑक्सडाईझ कलेक्शन, कोल्हापूरी साज, ठुशी अशी भरपूर व्हरायटी आणि नेहमीच्या डिझाईन्सबरोबर अस्सल मोत्याचे सोन्याचेही दागिने या महोत्सवात पहायला मिळतील. या महोत्सवाला भेट देण्याचे आवाहन श्यामला चिपडे, संजीवनी चिपडे, सिद्धांत चिपडे आणि पुष्कराज चिपडे यांनी केले.