लम्पीबाबत सतेज पाटील मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लम्पीबाबत सतेज पाटील मागणी
लम्पीबाबत सतेज पाटील मागणी

लम्पीबाबत सतेज पाटील मागणी

sakal_logo
By

अधिवेशनात कोल्हापूर... लोगो
....

पशुसंवर्धन विभागातील
रिक्त पदे तातडीने भरावीत
आमदार सतेज पाटील यांची विधान परिषदेत मागणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ ः लम्पी आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे जाचक अटी शिथिल करून तातडीने भरण्याची मागणी आमदार सतेज पाटील यांची विधान परिषदेत केली. जिल्ह्यात ३० हजार पशुधनामागे एक पशुधन विकास अधिकारी कार्यरत असल्याचे चित्र असून, राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत, असेही त्यांनी सांगितले.
पशुसंवर्धन विभागातील पदे रिक्त असल्यामुळे लम्पी आजारावर नियंत्रण आणण्यात अडथळे निर्माण होत आहेत. जनावरांच्या लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे जनावरांना वैद्यकीय मदत मिळण्यास गैरसोय होत असल्याकडे आमदार पाटील यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले. राज्यातील ३५५ पैकी २७२ तालुक्यांमध्ये लम्पी प्रादुर्भावामुळे ४ हजार गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडल्याचे समोर आले आहे. राज्याच्या पशुसंवर्धन विभागातील मंजूर ४ हजार ९५१ पदांपैकी सद्य:स्थितीत ३ हजार १४९ पदे भरलेली असून, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची एक हजार ८०२ पदे रिक्त आहेत. विशेषत: सांगली जिल्ह्यात २३१ आणि आणि कोल्हापूर जिल्ह्यात ५४ पशुधन अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. ९० पशुवैद्यकीय दवाखान्यात केवळ २९ पशुधन विकास अधिकारी कार्यरत आहेत. त्यामुळे पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीवरील सेवा रद्द करून त्यांना मूळ पदावर सेवेत रुजू करून घेणे आवश्यक आहे. लम्पी आजाराने पशुधन मृत्युमुखी पडलेल्या पशुपालकांना शासकीय मदत तातडीने मंजूर करण्यात यावी, अशी आग्रही भूमिका आमदार पाटील यांनी मांडली.