कोरोना पार्‍श्‍वभूमीवर आरोग्यीच बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना पार्‍श्‍वभूमीवर आरोग्यीच बैठक
कोरोना पार्‍श्‍वभूमीवर आरोग्यीच बैठक

कोरोना पार्‍श्‍वभूमीवर आरोग्यीच बैठक

sakal_logo
By

जिल्‍हा परिषद ... लोगो
....

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घ्या

आरोग्य विभागाची अधिकारी-कर्मचाऱ्यांना सूचना

सकाळ वृत्तसेवा

कोल्‍हापूर, ता. २२ : जिल्ह्यात कोविडची रुग्ण संख्या कमी झालेली आहे; परंतु अद्याप कोविड संपलेला नाही. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेनुसार कोविड नवीन व्हेरिएन्ट ओमिक्रोन सब टाईप बीएफ ७ ची लागण जिल्ह्यातील कोणालाही होऊ नये, याकरिता खबरदारी घ्यावी, अशा सूचना जिल्‍हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिल्या.

कोविडसंदर्भात चीन, जपान, अमेरिका, कोरिया आणि ब्राझीलसारख्या देशात रुग्णसंख्येमध्ये लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. सतर्कतेचा इशारा म्हणून आरोग्य विभागामार्फत पुन्हा नियोजन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, विस्तार अधिकारी, आरोग्य सहायक व आरोग्य सेवक, सेविका यांची बैठक घेत सूचना दिल्या.
एका ठराविक भागातून रुग्ण संख्या जास्त असल्यास जिनोम सिक्वेसिंगसाठी सूक्ष्म जीवशास्त्र विभाग येथे पाठविण्यात यावे, रुग्णसंख्या वाढल्यास पुन्हा सीसीसी, डिसीएचसी किंवा कोविड सेंटरची आवश्यकता भासल्यास यापूर्वी दिलेली वैद्यकीय साधने अद्ययावत करण्याबाबत सूचना करण्यात आल्या. तसेच आयसीयूसाठी आवश्यक साधनसामग्री तयार ठेवण्यावर चर्चा करण्यात आली. कोविड रोखण्यासाठी पुन्हा राहिलेल्या सर्व लाभार्थ्यांना लस देण्याचे नियोजन करण्याविषयी वैद्यकीय अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या.
...

या दिल्या सूचना...
बाधित देशातून येणाऱ्या‍ व्यक्‍तींचे विलगीकरण
लक्षणे दिसल्यास आरटीपीसीआर स्वॅब घेणार
कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यावर भर द्यावा
जंतुसंसर्ग थांबविण्यासाठी प्रयत्‍न करा