
आंतरजात-धर्मीय आदेश निदर्शने
70410
आंतरधर्मीय विवाह
पाळत आदेशाची होळी
आंतरजात-धर्म विवाह चळवळीचे आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ ः राज्य सरकारने आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांच्या माहिती गोळा करून त्यांची तक्रार निवारण समिती गठीत करण्याचा आदेश जारी केला आहे. हा आदेश महाराष्ट्राची फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारधारा व भारतीय राज्यघटनेच्या विरोधात असून, तो तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी आज आंतरजात-धर्म विवाह चळवळीने केली. चळवळीतर्फे ऐतिहासिक बिंदू चौकात या आदेशाची होळीही केली. ‘फुले- शाहू- आंबेडकरांचा विजय असो’, ‘भारतीय संविधान जिंदाबाद'', ‘जात वर्चस्वाद मुर्दाबाद'', अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
दलितमित्र व्यंकाप्पा भोसले, केंद्राचे सचिव गिरीश फोंडे यांनी सरकार केवळ राजकीय मतांचे धार्मिक ध्रुवीकरणासाठी हा आदेश काढला आहे, अशी टीका केली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अनिल चव्हाण यांनी समितीमध्ये नेमणूक केलेले सदस्य हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले. ‘एआयएसएफ''चे राज्य सचिव प्रशांत आंबी यांनीही मनोगत व्यक्त केले. अमोल देवडकर, गजानन विभुते, आरती रेडेकर, रमेश वडणगेकर, निलेश कसबे, सुनील कोळी, श्रीकांत आंबी, प्रीतम देवडकर, चंद्रकांत बागडी, गंगुबाई पाटील, निवास नलावडे आदी उपस्थित होते.