
घरफाळा विभागाला फलक नाही
70422
‘घरफाळा’च्या मुख्य कार्यालयास
फलक लावण्याची मागणी
कोल्हापूर, ता. २२ ः महापालिकेचा उत्पनाचा मुख्य स्त्रोत्र असलेल्या घरफाळा विभागाच्या शाहू क्लॉथ मार्केट येथील मुख्य कार्यालयास फलक महापालिकेने लावावा. अन्यथा नागरिक फलक लावून देतील, असे निवेदन कोल्हापूर शहर व नागरिक कृती समितीने करनिर्धारकांना आज दिले.
निवेदनात म्हटले आहे, या कार्यालयात दररोज अनेक नागरिक येतात. पण, फलकच नसल्यामुळे क्लॉथ मार्केटच्या इमारतीत घरफाळा विभागाचे कार्यालय शोधताना नागरिकांची दमछाक होते. या मुख्य कार्यालयास फलक लावण्यास महापालिकेकडे निधीची कमतरता असल्यास नागरिक कार्यालयाचा फलक लावून देतील. यावेळी अशोक पोवार, रमेश मोरे, भाऊ घोडके, चंद्रकांत सूर्यवंशी, राजाभाऊ मालेकर, विनोद डुणुंग, लहुजी शिंदे, चंद्रकांत पाटील, महादेव जाधव, पप्पू सुर्वे आदी उपस्थित होते.