कुमरीत विविध उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुमरीत विविध उपक्रम
कुमरीत विविध उपक्रम

कुमरीत विविध उपक्रम

sakal_logo
By

gad231.jpg
70429
कुमरी : प्राथमिक शाळेत झालेल्या कार्यक्रमात प्रतिमा पुजन करताना राजेंद्र देसाई. शेजारी शिक्षक व विद्यार्थी.

कुमरीत विविध उपक्रम
गडहिंग्लज : कुमरी (ता. गडहिंग्लज) येथील प्राथमिक शाळेत राष्ट्रीय गणित दिनानिमित्त विविध उपक्रम राबवले. मुख्याध्यापक राजेंद्र देसाई यांच्या हस्ते प्रतिमा पुजन झाले. अध्यापक महेश घुगरे यांनी किर्ती परचुरे लिखीत रामानुजन या पुस्तकातील कथा वाचन केले. सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी गणित गीत सादर केले. दिलीप पाटील, कृष्णा पाटील यांची भाषणे झाली. रंगावली स्पर्धेचे विजेचे असे- लहान गट- कादंबरी अडली व शर्वरी पाटील, आर्या होडगे, राजलक्ष्मी चव्हाण, मैत्रेयी गुरव. मोठा गट- प्रणाली नांदवडेकर, सारिका कांबळे, कादंबरी गुरव, सायली परीट. प्रश्न मंजुषा स्पर्धा- निशांत पोळकर, तन्मय ढोकरे, सारंग पोळकर. रंगभरण स्पर्धा- लहान गट- हर्षराज गायकवाड, वेदांत नांदवडेकर, आराध्या पाटील. मोठा गट- प्रांजल पाटील, साक्षी जाधव, प्रथमेश पाटील. विजेत्यांना बक्षीसांचे वितरण झाले. शोभा पोवार यांनी आभार मानले.
------------------------
सायन्स सेंटरमध्ये गणित दिन
गडहिंग्लज : मराठी विज्ञान परिषदेच्या येथील सायन्स सेंटरमध्ये राष्ट्रीय गणित दिन साजरा केला. श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पुजन बी. जी. काटे व डॉ. एस. के. नेर्ले यांच्या हस्ते झाले. डॉ. नेर्ले यांनी रामानुजन यांच्या कार्याची माहिती दिली. संजय घाटगे, अभिलाषा चव्हाण, सोनाली पाटोळे, सौ. करडे, श्री. जोडगुद्री आदी उपस्थित होते. दरम्यान, मराठी विज्ञान परिषदेतर्फे साधना हायस्कूल, नूल, कळविकट्टी, हेब्बाळ जलद्याळ, बसर्गे, हलकर्णी, उत्तूर, नेसरी येथे पोस्टर प्रदर्शन, गणित विषय शिकवण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंचे प्रदर्शन झाले.
-------------------------------
गडहिंग्लज हायस्कूलमध्ये प्रदर्शन
गडहिंग्लज, ता. 23 : येथील गडहिंग्लज हायस्कूलमध्ये राष्ट्रीय गणित दिनानिमित्त कार्यक्रम झाला. सी. सी. देसाई यांच्या हस्ते प्रतिमा पुजन झाले. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या गणितीय शैक्षणिक साधनांचे प्रदर्शन झाले. प्राचार्य पंडित पाटील व पर्यवेक्षक सुनील कांबळे, एस. एस. कुंभार, के. टी. शिवणे, ए. एस. पाटील, के. के. सूर्यवंशी, टी. डी. पाटील, तुकाराम भोसले आदी उपस्थित होते.
----------------------------
‘शिवराज’मध्ये भित्तीपत्रक अनावरण
गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात गणित विभागातर्फे राष्ट्रीय गणित दिन साजरा केला. विभाग प्रमुख प्रा. सचिन कांबळे यांनी स्वागत केले. गणित विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे अनावरण संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे व प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांच्या हस्ते झाले. अॅड. कुराडे यांनी गणितीय क्षेत्रात करिअरसाठी प्रयत्न होणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. डॉ. कदम यांचेही भाषण झाले. प्रा. कृष्णा कदम, प्रा. दिपिका खांडेकर-पंडित आदी उपस्थित होते.
-------------------------------
जरळी हायस्कूलमध्ये गणित दिन
नूल : जरळी (ता. गडहिंग्लज) येथील जरळी हायस्कूलमध्ये गणित तज्ञ रामानुजन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला. मुख्याध्यापक विठ्ठल चौगुले यांच्या हस्ते रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. श्रुती लब्बी, कावेरी देसाई, सारिका पांढरे, स्वप्नाली धनगर, कीर्ती कोणकेरी, पृथ्वीराज भमानगोळ, महानंदा धनगर, श्री. चौगुले यांची भाषणे झाली. गणिती गीते व गणिती उखाणे सादर करण्यात आले. प्रश्नमंजुषा स्पर्धा घेतली. एल. आर. मगदूम यांनी नियोजन केले. बी. ए. बाबान्नावर, एस. डी. काळे, महादेव धनगर, विवेक मास्तोळी, रावसाहेब कांबळे आदी उपस्थित होते. लक्ष्मी मगदूम यांनी प्रास्ताविक केले. एन. एस. लोंढे यांनी आभार मानले.