
गड-दारु जप्त
70494
गडहिंग्लज : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या कारवाईत जप्त केलेले वाहन, दारू, संशयित आरोपीसह (खाली बसलेला) राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, कर्मचारी.
-------------
कोंबड्यांच्या गाडीत सापडली दारू
वाघोत्रेत कारवाई : ४८ हजारांची दारू जप्त, एकास अटक
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २३ : कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनात गोवा बनावटीची दारू आढळली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाघोत्रे (ता. चंदगड) येथे कारवाई करीत ४८ हजार रुपयांच्या दारूसह चारचाकी वाहन जप्त केले. आज सकाळी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी गजानन महादेव गिलबिले (वय ३३, रा. बुजवडे, ता. चंदगड) याला अटक केली आहे.
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बेकायदेशीर मद्य वाहतुकीवर करडी नजर ठेवली आहे. तपासणी नाके लावण्यात आले आहेत. तसेच तपासणी पथकेही तयार केली आहेत. दरम्यान, वाघोत्रे-इसापूर रस्त्यावर गस्त घालत असताना संशयास्पद चारचाकी वाहन आढळले. कोंबड्यांची वाहतूक करणारी ही गाडी होती. त्याची तपासणी केली असता गोवा बनावटीच्या दारूचे १० बॉक्स आढळून आले. या दारूसह गाडी जप्त केली आहे.
उपअधीक्षक आर. एल. खोत, निरीक्षक एम. एस. गरुड, उपनिरीक्षक किरण पाटील, एल. एन. पाटील, अजय लोंढे, सहायक दुय्यम निरीक्षक एस. आर. ठोंबरे, जवान बी. ए. सावंत, जी. एस. जाधव, एस. बी. चौगुले, ए. टी. थोरात, योगेश शेलार, मनोज पवार, कृष्णात पाटील यांनी ही कारवाई केली.