Tue, Jan 31, 2023

आजरा अर्बन बॅंकेचे उद्या सभासद प्रशिक्षण
आजरा अर्बन बॅंकेचे उद्या सभासद प्रशिक्षण
Published on : 23 December 2022, 2:27 am
आजरा अर्बन बॅंकेचे उद्या सभासद प्रशिक्षण
आजरा, ता. २३ ः येथील दि. आजरा अर्बन बॅंकेच्यावतीने रविवार (ता. २५) आजरा परिसरातील सभासदांसाठी सभासद प्रशिक्षण कार्यक्रम होत आहे. आजरा हायस्कूल येथील अणाभाऊ सांस्कृतिक सभागृहात सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत होईल. सहकारी संस्था, कोल्हापूरचे विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांच्याहस्ते उद्घाटन होईल. ते मार्गदर्शन करतील. चार्टड अकौंटंट धिरज देशपांडे, आजरा अर्बन बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत. सहकारातून समृध्दीकडे, सुरक्षित आर्थिक व्यवहार, आर्थिक साक्षरता या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. सभासदांनी प्रशिक्षणात सहभागी व्हावे, असे आवाहन आजरा अर्बन बॅंकेच्या प्रशासनाच्यावतीने केले आहे.