उत्तूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उत्तूर
उत्तूर

उत्तूर

sakal_logo
By

अपघातातील जखमींना
आपटे फोंडेशनची मदत
उत्तूर ता. २३ : मुमेवाडी-उत्तूर (ता. आजरा) रस्त्यावर बस व मालवाहतूक टेंपोची धडक होऊन २८ प्रवासी जखमी झाले होते. प्रवाशांना रुग्णालयात पोचवणे, औषधांसाठी मुकुंदरावदादा आपटे फोंडेशनने ५० हजार रु. आर्थिक मदत केली.
एस. टी प्रशासनाने १९ प्रवाशांना प्रत्येकी ५०० रु.प्रमाणे मदत केली. बसला बामणे वसाहतीजवळ गुरुवारी झालेल्या अपघाताची दखल जिल्हा परिषद सदस्य उमेश आपटे यांनी घेतली. जखमींना तातडीने उत्तूर व गडहिंग्लजला रुग्णालयांत हलवले. यासाठी फौंडेशनच्या दोन रुग्णवाहिका कार्यरत होत्या. गंभीर दुखापत झालेल्या प्रवाशांच्या १० रुग्णांच्या औषधांचा खर्च ३७ हजार झाला. हा खर्च फौंडेशनने केला. दरम्यान विभागीय वाहतूक अधिकारी एस. बी. जाधव व गडहिंग्लज आगारप्रमुख एस. बी. चव्हाण यांनी खासगी रुग्णालयात १९ जखमी प्रवाशांची भेट घेत मदत केली. रुग्णालयातील अहवालानुसार जखमी प्रवाशांना आर्थिक मदत केली जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले.