आजरा महाविद्यालयात जात प्रमाणपत्र पडताळणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा महाविद्यालयात जात प्रमाणपत्र पडताळणी
आजरा महाविद्यालयात जात प्रमाणपत्र पडताळणी

आजरा महाविद्यालयात जात प्रमाणपत्र पडताळणी

sakal_logo
By

आजरा महाविद्यालयात
जात प्रमाणपत्र पडताळणी
आजरा, ता. २३ ः येथील आजरा महाविद्यालय आजरा येथे समान संधी केंद्र यांच्यावतीने जात प्रमाणपत्र पडताळणी प्रशिक्षण झाले. या शिबीरात सौ. प्रतिभा सावंत (बार्टी, कोल्हापूर) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे अध्यक्षस्थानी होते. सौ. सावंत म्हणाल्या, ‘बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी आवश्यक आहे. त्यासाठी लागणारी विविध कागदपत्र व प्रक्रियेची माहीती दिली. सर्वच विद्यार्थांनी जातीचे प्रमाणपत्र काढून त्याची पडताळणी करून घ्यावी.’
प्राचार्य डॉ. सादळे म्हणाले, ‘आरक्षणाचा व शिष्यवृत्तीचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा.’ उपप्राचार्य प्रा. दिलीप संकपाळ यांनी मनोगत व्यक्त केले. आजरा महाविद्यालय, व्यंकटराव ज्युनिअर कॉलेज, कला, वाणिज्य व शास्त्र ज्युनिअर कॉलेज आजरा येथील विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रा. विनायक चव्हाण, प्रा. राजीव कर्पे, प्रा. संतोष कांबळे, प्रा. संदिप देसाई, प्रा. भरत वायकसकर, लिपीक प्रविण कोळी, सौ. सारिका रनवरे, सौ. माधुरी देवार्डे, सौ. नलिनी सुतार उपस्थित होते. प्रा. ज्योती कुंभार यांनी स्वागत, प्रास्ताविक करून आभार मानले.