आर. आर. अकॅडमीत गणित दिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आर. आर. अकॅडमीत गणित दिन उत्साहात
आर. आर. अकॅडमीत गणित दिन उत्साहात

आर. आर. अकॅडमीत गणित दिन उत्साहात

sakal_logo
By

gad236.jpg
70570
गडहिंग्लज : आर. आर. अकॅडमीमध्ये झालेल्या कार्यक्रमात मंजिरी देशपांडे यांचा सत्कार करताना एच. रेड्डी. शेजारी जितेंद्र मौर्य, अनिता एस. आदी.
----------------------------
आर. आर. अकॅडमीत
गणित दिन उत्साहात
गडहिंग्लज, ता. २३ : येथील आर. आर. अकॅडमीमध्ये राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा केला. अकॅडमीच्या समन्वयिका मंजिरी देशपांडे यांच्या हस्ते श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. गणित विषयाचे प्रा. जितेंद्र मौर्य व सौ. देशपांडे यांचा सत्कार केला.
सौ. देशपांडे म्हणाल्या, ‘जागतिक स्तरावर भारतीय गणिताचा प्रभावी ठसा उमटवण्याचा सन्मान सर्वतोपरी रामानुजन यांना जातो.’ अकॅडमीचे संचालक प्रा. डॉ. अनिता एस यांनीही रामानुजन यांच्याविषयीची माहिती दिली. एच. रेड्डी, मौर्य, समीक्षा गावडे, अथर्व क्षीरसागर, संकेत जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. श्रेया देसाई, मैथील किंकर, पार्श्‍व निकम यांनी सूत्रसंचालन केले. तेजस कोरवी यानी आभार मानले.