ग्राहक दिन विशेष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्राहक दिन विशेष
ग्राहक दिन विशेष

ग्राहक दिन विशेष

sakal_logo
By

ग्राहक दिन ... विशेष
....

ग्राहक तक्रारींचा आकडा १८ हजारांवर

३२ वर्षांतील जिल्ह्यातील स्थिती ः १६ हजारांवर तक्रारी निकाली

नंदिनी नरेवाडी : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ ः एका छोट्याशा दुकानातून एका शेतकऱ्याने दहा रुपयांचा बिस्किट पुडा विकत घेतला. तो घेताना त्या पुड्याचे वजन त्याच्या पाकिटावर लिहिलेल्या वजनापेक्षा कमी जाणवले. त्या शेतकऱ्याने दुकानदाराकडे चौकशी केली. मात्र, त्याचे समाधान झाले नाही. कोल्हापुरातील जिल्हा ग्राहक तक्रार निवार आयोगाकडे तक्रार दाखल केली. आयोगाने ‘तो’ बिस्किटपुडा वैधमापन शास्त्र विभागाकडे पाठवून वजनाची शहानिशा केली. त्याचे वजन कमी भरले आणि कोल्हापुरातून नामांकित बिस्किट कंपनीला ५० हजार रुपयांचा दंड झाला. हे झाले एक प्रातिनिधिक उदाहरण. अशा छोट्या मोठ्या खरेदीतून झालेल्या फसवणुकीसाठी ग्राहकांनी सजग होत ग्राहक आयोगाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. नोव्हेंबर २०२२ अखेर १८ हजार ५४९ केसेस दाखल झाल्या असून, त्यापैकी १६ हजार ३७५ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.
१९८६ मध्ये ग्राहक कायदा अंमलात आला. त्यानुसार ग्राहकाला महत्त्व प्राप्त झाले. एखादी वस्तू, सेवा विकत घेतो तो ग्राहक. सेवा पुरवठादार किंवा विक्रेत्यांकडून एखादी वस्तू, सेवा मोबदला देऊन विकत घेतल्यास त्या वस्तू दोषपूर्ण असल्यास किंवा त्यामध्ये काही कमतरता असेल तर ग्राहकांना तक्रार करण्याची मुभा दिली. त्यानुसार जिल्ह्यात ग्राहक तक्रार निवारण आयोगाची १९९१ मध्ये स्थापना झाली. २०२० मध्ये ग्राहक कायद्यात दुरूस्ती करण्यात आली. त्यामध्ये ग्राहकांना आणखी अधिकार दिले गेले. संपूर्ण महाराष्ट्रातून कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक ग्राहकांच्या तक्रारी दाखल झाल्या असून, यामध्ये आर्थिक व्यवहारातील फसवणुकीच्या सर्वाधिक तक्रारींची संख्या आहे. तसेच, बँका, पतसंस्था, फायनान्स कंपन्या, विमा कंपन्या, विविध उत्पादक कंपन्या, बांधकाम क्षेत्र, वधू - वर सूचक मंडळ, औषधे - सौंदर्यप्रसाधने कंपन्या, बी - बियाणे उत्पादक कंपन्या, ट्रॅव्हल्स कंपन्या अशा विविध क्षेत्रांतील फसवणुकीसंबंधी ग्राहक आयोगाकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत.
-------
दृष्टिक्षेपात

बँकासंबंधित - ६१८
विमा - ५९५
बांधकाम संबंधित - ३००
वीज - ८६
आरोग्य विमा - ३८
शैक्षणिक - ६
रस्ते वाहतूक - ४
फायनान्स कंपन्या - ११८
------------
एकूण दाखल केसेस - १८,५४९
निकाली केसेस - १६,३७५
प्रलंबित केसेस - २,१७४
----
कोट
70613

‘ग्राहकांनी कोणतीही वस्तू किंवा सेवा खरेदी करताना सजग असले पाहिजे. वस्तूचे वजन, समाप्ती तिथी, उत्पादक तिथी अशा बाबी तपासून घ्याव्यात. वस्तू किंवा सेवा घेताना काही फसवणूक झाल्यास जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तसेच https://edaakhil.nic.in/ या वेबसाईटवर तक्रार दाखल करावी.

- सविता भोसले. अध्यक्षा, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग