परदेशी पर्यटन कोरोना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परदेशी पर्यटन कोरोना
परदेशी पर्यटन कोरोना

परदेशी पर्यटन कोरोना

sakal_logo
By

परदेशी पर्यटनाचा मार्ग तुर्त खुलाच
केंद्र सरकारकडून अद्याप र्निबंध नाहीत; दक्षिण, उत्तर भारतातील स्थळांनाही पसंती

शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर ,ता. २१ ः चिनमधील नवा व्हेरीयंटमुळे कोरोनाच्या चिंतेचे ढग पुन्हा दाटू लागले आहेत. त्याचा फटका परदेशी पर्यटनाला बसण्याची शक्यता आहे. असे असले तरी केंद्र सरकारकडून परेदशी सहलीवर तुर्त कोणतेही र्निबंध नसल्याने परदेशी पर्यटन करण्यास अडचण नसल्याचा निर्वाळा स्थानिक टुरिस्ट व्यवसायिकांकडून देण्यात आला. सध्या देशी पर्यटनही तेजीत असून, दक्षिण व उत्तर भारत भ्रमनाला सर्वाधिक पर्यटकांची पसंती असल्याचे सांगण्यात आले.
कोरोनाकाळात सुरूवातीला देशी पर्यटक परदेशात अडकले होते. ते कसे बसे भारतात आले. त्यानंतर त्यांना क्वारंटाईन व्हावे लागले. त्यानंतर दिर्घकाळ परदेशी पर्यटन बंद होते. यात कोल्हापूरातून जवळपास ४० कोटींची गुंतवणूक अडकली होती. परदेशात बुकींग झाले होते त्याचे पैसे अडकले होते. दीड वर्षात कोरोना र्निबंध शिथिल झाले तसे परदेशी पर्यटन पुन्हा सुरू झाले. परदेशी पर्यटनाला चांगले दिवस आले यात थोडा जम बसत असताना पुन्हा कोरानाच्या चिंतेचे ढग दाटले.
आंतरराष्ट्रीय पर्यटनावर गदा येते की काय अशी भीती व्यक्त होत आहे. कोल्हापूरातून जवळपास १५ ते २० अधिक टुर्स कंपन्यांकडे परदेशी पर्यटनाची नोंदणी होते. यातील वास्तव जाणून घेण्यासाठी विदेशी पर्यटन सुविधा देणाऱ्या व्यवसायिकाशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेली माहिती नुसार कोल्हापूरात विदेशी पर्यटनास जाणाऱ्यांच्या संख्येत तुर्त कोणताही फरक पडलेला नाही. रोजच ७० ते ८० जणांकडून चौकशी होते. यातील दहा ते वीस जनांची परदेशात जण्यासाठीची नोंदणी होते. मात्र, कोरोनामुळे पुन्हा र्निबंध येतील का? आम्ही परदेशात अडकून पडणार नाही ना अशा चिंतेचे प्रश्न मात्र बहुतेकजण विचारात आहेत. असे असले तरी युरोप, जर्मन, अमेरिका, फ्रान्स या देशात जाणाऱ्या पर्यटकांची नोंदणी मात्र कायम आहे. यात अनेकजन शैक्षणिक कारणाने, काहीजन नोकरी व्यवसाय तर काहीजन निव्वळ पर्यटनास जाणार आहेत. तर मोजका वर्ग संशोधन, कार्यशाळा, आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी जाणार आहे.

कोट
भारतातून परदेशात जाण्यास, परदेशातून भारतात येण्यास तुर्त र्निंबध नाहीत. खबरदारीचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांची विमानतळावर आरोग्य तपासणी होणार आहे तसेच संसर्ग होणार नाही याची काळजी घेऊन प्रवास करण्याच्या सूचनाही आहेत. त्याचे पालन करून परदेशात प्रवास करता येत आहे. त्यानुसार परदेशी जाणाऱ्या येणाऱ्यांची संख्या अद्याप कायम आहे. परदेशी व देशी सहलीचे नियोजन अनेकजण करत आहेत.
-रविंद्र पोतदार, व्यवस्थापक, गिरीकंद टुर्स ट्रॅव्हल्स