Tue, Jan 31, 2023

हद्दवाढ बैठक
हद्दवाढ बैठक
Published on : 23 December 2022, 3:57 am
शहराच्या हद्दवाढीबाबत आज बैठक
कोल्हापूर, ता. २३ ः शहराच्या हद्दवाढीबाबत उद्या (ता. २४) हद्दवाढ कृती समितीची पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत बैठक होत आहे. दोन महिन्यांपासून या बैठकीबाबत पाठपुरावा केला होता. अखेर काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिल्यानंतर बैठकीचे नियोजन झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी एक वाजता ही बैठक होत आहे. तत्कालीन नगरविकास मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी हद्दवाढीचा प्रस्ताव मागविला होता. त्यानंतर सत्ता बदलली, नवीन पालकमंत्री आल्यानंतर दोन महिने जिल्हाधिकाऱ्यांसोबत हद्दवाढविषयी पालकमंत्र्यांसोबत बैठक लावण्याची मागणी कृती समितीच्या वतीने केली जात होती; पण वेळ मिळत नव्हती. उद्या कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या पालकमंत्र्यांनी वेळ दिली नाही तर काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला.