गड-लोकशिक्षण व्याख्यानमाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड-लोकशिक्षण व्याख्यानमाला
गड-लोकशिक्षण व्याख्यानमाला

गड-लोकशिक्षण व्याख्यानमाला

sakal_logo
By

लोकशिक्षण व्याख्यानमाला
... लोगो
----------

70635
गडहिंग्लज : नगर परिषदेतर्फे आयोजित लोकशिक्षण व्याख्यानमालेत बोलताना अनंत राऊत.
---------------

कवितेचा जन्म काळजात
---
अनंत राऊत; काव्यातून ओढले समाजव्यवस्थेवर कोरडे
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २३ : कविता डोक्यात जन्म घेत नाही, तर तिचा जन्म काळजात होतो. ती काळजातच राहते आणि थेट समोरच्या व्यक्तीच्या काळजात पोचते. समाजाच्या प्रत्येक वेदनेची एक खिडकी कवीच्या काळजात उघडत असते. आठ ओळींची कविता १०० मस्तके शिवते, असे प्रतिपादन कवी अनंत राऊत यांनी केले.
येथील नगर परिषदेच्या साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयातर्फे लोकशिक्षण व्य़ाख्यानमाला सुरू आहे. राऊत यांनी ‘कवितेतील जगणं आणि जगण्यातील कविता’ या विषयाची मांडणी करताना व्याख्यानमालेत सहावे पुष्प गुंफले. पहाडी आवाजात कविता सादर करताना त्यांनी समाजव्यवस्थेवर कोरडे ओढले. माजी नगराध्यक्ष बापूसाहेब म्हेत्री अध्यक्षस्थानी होते. ‘स्वाभिमानी’चे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर, काँग्रेसचे शहराध्यक्ष बसवराज आजरी यांची प्रमुख उपस्थिती होती. बॅ. नाथ पै विद्यालयाच्या मैदानावर ही व्याख्यानमाला सुरू आहे.
राऊत म्हणाले, की आजच्या तरुणांत मोठी ताकद आहे. त्यांनी राजकारण्यांच्या नादाला लागू नये. राजकारण गढूळ आहे इतके म्हणत बाहेर थांबण्याऐवजी राजकारणात उतरून ते स्वच्छ करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. परिवर्तनासाठी तरुणांनी पुढे येण्याची गरज आहे. थेट काळजाला हात घालणाऱ्या कवितांच्या सादरीकरणाला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.
वैशाली पाटील यांनी स्वागत केले. समृद्धी खोत यांच्या ‘शब्दगंध’ या काव्यसंग्रहाचे या वेळी प्रकाशन झाले. मुख्याधिकारी स्वरूप खारगे उपस्थित होते. बाळासाहेब मुल्ला यांनी आभार मानले.
....

चौकट

दंगल विझण्याचे ठिकाण...
राऊत म्हणाले, की शाहू महाराजांचा कोल्हापूर जिल्हा मला सर्वांत आवडतो. कारण या कोल्हापुरात जातीयतेचा, धार्मिकतेचा कट्टरवाद पाहायला मिळत नाही. जातीय, धार्मिक दंगल कुठेही पेटली तरी तिचे विझण्याचे एकमेव ठिकाण कोल्हापूर असते. जात, पंथ, धर्मापलीकडे जगणारा हा जिल्हा आहे.
...

* आजचे व्याख्यान...
- वक्ते : सोनाली नवांगुळ
- विषय : संवादाचे गल्लीबोळ
- वेळ : सायंकाळी ६.३०